Share

माफियांनी ७ वेळा केला हल्ला, एक डोळाही गमावला; जिद्दीने युपीएससी क्रँक करत मिळवले यश

नुकताच यूपीएससीचा निकाल लागला. अनेक खडतर परिस्थितीमधून अभ्यास करून परीक्षेत यश मिळणारी उदाहरणे या निमित्ताने पुढे आली. यामध्ये रिंकू राही यांचे देखील उदाहरण आहे. रिंकू राही पीसीएस अधिकारी असून यांनी अनेक संकटांना सामोरे जाऊन आपल्या जिद्दीने यूपीएससी क्रॅक केली आहे.

समाज कल्याण विभागात अधिकारी असलेल्या रिंकू सिंह यांनी १३ प्रयत्नानंतर युपीएससी परिक्षेत यश मिळवलं आहे. त्यांना ६८३वा रँक मिळाला आहे. अलीगढच्या डोरी नगरचे ते रहिवासी आहेत. अनेक अडचणींवर मात करत युपीएससीचं स्वप्न त्यांनी साकार केलं, यामुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

रिंकू राही २००४ च्या बॅचचे पीसीएस अधिकारी असून हापुडी येथील समाज कल्याण विभागात अधिकारी आहेत. समाज कल्याण विभागात काम करत असतानाच त्यांनी युपीएससीची तयारीही सुरू ठेवली. रिंकू सिंह यांनी याआधी १२ वेळ वेळा प्रयत्न केल्यानंतर आता त्यांना युपीएससी ६८३ रँक मिळाली आहे. आता रिंकू सिंह पीसीएसहून आयएएस अधिकारी झाले.

रिंकू राही यांच्या जीवनात आलेल्या अडचणींबद्दल सांगायचे झाल्यास, पीसीएस अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुजफ्परनगर येथे झाली होती. तिथे भ्रष्टाचार प्रकरणातील चौकशी ते करत होते. त्याचदरम्यान २००८ मध्ये त्यांच्या राहत्या घरी हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला.

या हल्ल्यात हल्लेखोरांनी त्यांच्यावर सात गोळ्या झाडल्या. त्यातच त्यांचा एक डोळा निकामी झाला. जवळपास चार महिने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, या हल्ल्यानंतर देखील रिंकू सिंह डगमगले नाहीत. त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात आपली मोहिम कायम ठेवली.

दरम्यान, २०१५- १६ मध्ये श्रावस्ती व २०१८ मध्ये ललितपूर येथे पोस्टिंग दरम्यान त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले होते. ड्युटी करत असताना प्रशासनाकडून रिंकू सिंह राही यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. यामागचे कारण त्यांचा प्रामाणिकपणा होता. मात्र या अडचणी आल्यामुळे त्यांनी कधीच आपला प्रामाणिकपणा सोडला नाही.

इतर

Join WhatsApp

Join Now