विवाह सोहळा म्हणजे आनंद… दोन कुटुंबाचे नव्याने नात तयार होतं असतं. तसेच वधू – वराचे सात जन्माचे नातं बांधले जाते. मात्र अनेकदा विवाह सोहळ्यादरम्यान गोंधळ उडतो, अशा बातम्या तुम्ही वाचल्या असतील. याचबरोबर वादही मोठ्या प्रमाणत विवाहात होताना आपण पाहिले असतील.
असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशमधील रिवा येथे घडला आहे. विवाह सोहळा आनंदात सुरू होता मात्र ऐनवेळी नवरीने लग्नास नकार दिल्याने गोंधळ उडाला. परंपरेनुसार नवरदेव आला तेव्हा काही लोक नवरी पक्षाकडील महिलांवर बत्ताशे फेकत होते, असे नवरी कडच्या लोकांनी सांगितले.
काही वराती हे महिलांवर निशाणा साधून बत्ताशे मारत असल्याने वाद निर्माण झाला, मात्र तो वाद जेष्ठ लोकांनी मिटला. मात्र पुन्हा एकदा या विवाह सोहळ्यात वादाची ठिणगी पडली. हार घालताना वरातील आलेले काही तरूण नवरदेवाला स्पर्श करत होते. हे बघून नवरीकडील लोक संतापले.
दरम्यान, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवरीकडील लोकांनी काठ्या काढल्या आणि नवरदेवासोबत इतरांनाही कोंडून चोप दिला. यामुळे विवाह सोहळ्यात एकच गोंधळ उडाला. यावेळी दोन्ही पक्षात हाणामारी झाली. याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
तसेच याबाबत विचारले असता नवरीने सांगितले की, नवरदेवाची मानसिक स्थिती ठीक नव्हती. त्यामुळे लग्न करण्यास नकार दिला. आणि याच कारणावरून या विवाह सोहळ्यात वाद निर्माण झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, नवरदेवाला देखील मारहाण करण्यात आली. याचबरोबर नवरदेवाला मंडपातून ओढत नेण्यात आले.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. येथे जाऊन पोलिसांनी दोन्हीही गटातील वाद मिटवले. तसेच सध्या या विवाहाची जोरदार सर्वत्र चर्चा सुरू आहे. नवरीने लग्नास नकार दिल्यावर नवरदेवाला मात्र रिकाम्या हातीच परतावे लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भाजप शहराध्यक्षाच्या घरावर पोलिसांनी छापा मारताच उडाली खळबळ, चालू होता जुगाराच अड्डा
बप्पी लहरींसोबत ब्रालेस फोटो शेअर करणे अदा शर्माला पडले महागात, नेटकऱ्यांनी झाप झाप झापले
गुंडांचा धुमाकूळ! हातात तलवारी घेऊन वाहनांची केली तोडफोड, लोकांची दुकानं केली बंद
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी करा लसण्याच्या पाण्याचे सेवन, एका आठवड्यात दिसेल फरक