Share

Madhuri Dixit: भाड्याच्या घरातून आता स्वताच्या घरात शिफ्ट होणार माधुरी, तब्बल इतक्या कोटींना घेतला नवीन फ्लॅट

Madhuri Dixit

Madhuri Dixit, Bollywood Celebrities, Vivek Agnihotri, The Kashmir Files/ सध्या बॉलिवूड सेलिब्रिटी स्वत:साठी नवीन घरे खरेदी करत आहेत. नुकतीच बातमी आली होती की, ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी मुंबईत एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. आता माधुरी दीक्षितनेही स्वतःसाठी फ्लॅट खरेदी केला आहे. बातम्यांनुसार, माधुरीने नवरात्रीच्या मुहूर्तावर एक नवीन अपार्टमेंट खरेदी केले आहे.

मुंबईतील लोअर परेल भागातील या अपार्टमेंटसाठी त्यांनी 48 कोटी रुपये दिले आहेत. या मालमत्तेची नोंदणी 28 सप्टेंबर 2022 रोजी झाली होती. 53व्या मजल्यावर असलेले हे अपार्टमेंट 5,384 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे. या अपार्टमेंटसोबतच त्याला सात कार पार्किंग स्लॉटही मिळाले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये माधुरीने मुंबईत तीन वर्षांसाठी 12.5 लाख रुपये प्रति महिना भाड्याने घर घेतले होते. आता ती लवकरच तिच्या घरी शिफ्ट होणार असल्याचे बोलले जात आहे.

बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ राज्य करणारी माधुरी दीक्षित बऱ्याच दिवसांपासून रुपेरी पडद्यावर दिसलेली नाही. ती शेवटची करण जोहरच्या मल्टीस्टारर चित्रपट कलंकमध्ये दिसली होती. त्यानंतर वेब सीरिजमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिची वेब सीरिज मजा मा 6 ऑक्टोबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. याआधी ती वेब सीरिज फेम गेममध्ये दिसली होती. माधुरी सध्या तिच्या वेब सीरिजचे प्रमोशन करत आहे.

आजच्या परिस्थितीबद्दल बोलताना माधुरीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, आता काळ खूप बदलला आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीत याआधीही महिलांच्या प्रमुख भूमिकेवर चित्रपट बनवले गेले आहेत, पण असे चित्रपट त्यावेळी फार कमी झाले आहेत. पण आता महिलांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. महिलांसाठी हा काळ खूप चांगला आहे. आता चित्रपटांमध्येही महिलांचे महत्त्व वाढले आहे.

माधुरी दीक्षित सध्या खूप बिझी आहे. एकीकडे ती तिच्या ‘मजा मा’ या वेब सीरिजचे प्रमोशन करत आहे तर दुसरीकडे ती टीव्हीचा डान्स रिअॅलिटी शो झलक दिखला जा 10 जज करत आहे. तसेच, माधुरीने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा जास्त ब्लॉक बस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे.

एक काळ असा होता की बॉलीवूडमध्ये माधुरीचेच वर्चस्व होत. त्यानंतर तिने लग्न केले आणि चित्रपटांना अलविदा करत अमेरिकेला शिफ्ट झाली. त्यानंतर वर्षांनंतर ती इंडस्ट्रीत परतली, मात्र, ती पुन्हा आपला जलवा दाखवण्यात यशस्वी होऊ शकली नाही.

महत्वाच्या बातम्या-
५४ वर्षांच्या माधुरी दीक्षितचा हॉटनेस पाहून १६ वर्षांनी लहान अभिनेताही झाला घायाळ, पहा फोटो
लक्ष्मीकांत बेर्डे-माधुरी दीक्षित यांचा २८ वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांच्या भावुक प्रतिक्रिया
Madhuri dixit : माधुरी दीक्षितने बॉलीवूडचा खरा चेहरा आणला समोर; सांगितला ‘हा’ लाजिरवाणा प्रकार

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now