बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. माधुरी तिच्या अभिनय आणि डान्ससोबत तिच्या सौंदर्यानेही सर्वांना घायाळ करत असते. आपल्या अभिनयाच्या जोरावर माधुरीने सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. पण एककाळ असा होता जेव्हा माधुरीला तिच्या लूक्समुळे लोक तिला टोमणे मारत असत. स्वतः माधुरीने याबाबत एका मुलाखतीत बोलताना खुलासा केला आहे.
माधुरीने नुकतीच आरजे सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. यावेळी बोलताना माधुरीने सांगितले की, कशाप्रकारे तिला इंडस्ट्रीत आल्यावर लोकांचे बोलणे ऐकावे लागले होते. तसेच सुरुवातीच्या काळात तिला किती संघर्ष करावा लागला होता, याबाबतही तिने यावेळी बोलताना सांगितले.
माधुरीने म्हटले की, ‘जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये आले होते तेव्हा लोक म्हणत असत की, मी हिरोईनसारखी दिसत नाही. कारण त्यावेळी मी खूपच तरूण होते. मी वयाने लहान, मराठी कुटुंबातून आलेली आणि खूपच लहान मुलगी दिसत असत. हिरोईन कशी असावी, याबाबत तेव्हाच्या लोकांची धारणा वेगळी होती’.
माधुरीने पुढे सांगितले की, ‘माझी आई खूप धैर्यवान महिला आहे. ती म्हणत असत की, तुम्ही चांगले काम करत राहिल्यास तुम्हाला नक्कीच ओळख मिळेल. मी नेहमी तिचा सल्ला घेत असत. ती सांगत असत की, यश मिळाल्यास लोक इतर गोष्टी विसरून जातात’.
माधुरीने १९८४ साली आलेल्या ‘अबोध’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण तिला १९८८ साली आलेल्या ‘तेजाब’ या चित्रपटामुळे ओळख मिळाली. या चित्रपटानंतर माधुरी ‘साजन’, ‘दिल तेरा आशिक’, ‘बेटा’, ‘हम आपके है कौन’, ‘दिल तो पागल है’, ‘देवदास’ यासारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले.
दरम्यान, माधुरीने नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल माध्यमात डेब्यू केला आहे. नेटफ्लिक्सवरील ‘द फेम गेम’ हा तिचा पहिला वेबसीरीज नुकताच प्रदर्शित झाला. या सीरीजमध्ये माधुरीसोबत संजय कपूर, मानव कौल यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. यामध्ये माधुरीने अनामिका नावाची भूमिका साकारली होती जी अचानक गायब होते.
महत्त्वाच्या बातम्या :
किशोरी शहाणेंच्या मुलाला चित्रपटसृष्टीत काम मिळणे झालंय कठीण; म्हणाल्या, ‘एक तरी संधी द्या, तो ऑलराऊंडर आहे’
आदित्य नारायणने ‘या’ कारणामुळे ‘सा रे ग म प’ला ठोकला रामराम; भावूक पोस्ट शेअर करत म्हणाला..
इतक्या वर्षानंतरही कमी नाही झाली शाहरूख खानची क्रेझ, ‘पठाण’साठी घेतले तब्बल ‘एवढे’ कोटी