बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे (Madhuri Dixit) केवळ भारतातच नाही तर जगभरात अनेक चाहते आहेत. तिच्या अभिनयासोबत तिच्या सौंदर्याचेवरही अनेकजण फिदा आहेत. तिच्या हास्यावर तर लाखो लोक मरतात. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक असतात. आपल्या सौंदर्याने आणि आपल्या हास्याने माधुरी नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. असंच काहीसं एका शोदरम्यान घडलं जेव्हा माधुरी तिच्या आगामी वेबसीरीजच्या प्रमोशनसाठी स्टेजवर पोहोचली होती.
माधुरी दीक्षित तिच्या ‘फेम गेम’ या वेबसीरीजच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात पोहोचली होती. यावेळी तिच्यासोबत या सीरीजशी संबंधित इतर कलाकारही उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान एक एक करत सर्व कलाकार स्टेजवर पोहोचत होते. पण जेव्हा माधुरी रेड कार्पेटवर उतरली तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळून राहिल्या. कारण माधुरीने या कार्यक्रमासाठी निवडलेला लूकही तितकाच खास होता.
माधुरीने कार्यक्रमासाठी ब्लॅक कलरचा बॉडिकॉन ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसला स्ट्रेट नेकलाईन असून त्याला स्पगॅटी स्ट्रॅप्सी सिल्वज जोडण्यात आले. वेगन लेदरद्वारे हा ड्रेस तयार करण्यात आला. या आऊटफिटसोबत माधुरीने अॅक्सेसरीज खूपच कमी वापरले. तसेच या लूकसाठी तिने केस मोकळे सोडले असून हलकासा मेकअप केला. पण माधुरीच्या चेहऱ्यावरील स्माईलने तिच्या सौंदर्याला चार चाँद लावले.
वेस्टर्न लूकमध्ये माधुरी अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसून आली होती. स्टेजवर तिची एंट्री होताच सर्वजण तिला बघतच राहिले. यामध्ये तिथे उपस्थित कार्यक्रमाचा होस्ट अर्जून बिजलानीसुद्धा माधुरीला पाहून स्वतःचा भान हरपून बसला. ५४ वर्षाच्या माधुरीचे सौंदर्य पाहून तो तिच्यावर फिदा झाला. माधुरीची जेव्हा एंट्री झाली तेव्हा अर्जूनच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे होते.
माधुरीला जास्तकरून भारतीय पोशाखात पाहण्यात आले. पण याचा अर्थ असा नाही की, ती वेस्टर्न कपड्यांमध्ये चांगली दिसत नाही. तर ब्लॅक ड्रेसमधील तिचे हे फोटो पुरावा आहेत की, माधुरी वेस्टर्न लूकमध्येही तितकीच सुंदर दिसते. कार्यक्रमासाठी माधुरीने असा मिडी ड्रेस निवडला जे तिच्या फिगरला परफेक्ट फ्लॉन्ट करत होते.
दरम्यान, माधुरीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास सध्या ती तिच्या ‘द फेम गेम’ या वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. नुकतीच २५ फेब्रुवारी रोजी तिची ही सीरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. या सीरीजमध्ये माधुरी वेगळ्याच अंदाजात दिसून आली. या सीरीजद्वारे माधुरीने डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘गेहराइयां’ फेम सिद्धांत चतुर्वेदीचं ४ वर्षानंतर ब्रेकअप; म्हणाला, मला तिच्यासोबत..
दादूस झाला शेठमाणूस; विनायक माळीने खरेदी केली ‘एवढ्या’ लाखांची मर्सिडीज; म्हणाला, ‘घेतली एकदाची’
Varsha Usgaonkar Birthday: वर्षा उसगांवकरने एकदा केलं होतं टॉपलेस फोटोशूट, झाली होती प्रचंड टीका