Share

लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने मान्यता दत्तने शेअर केला खास व्हिडिओ; पत्नीचे पाय दाबताना दिसून आला संजय दत्त

Maanayata dutt and sanjay dutt

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्तने (Maanayata dutt and sanjay dutt ) शुक्रवारी त्यांच्या लग्नाचा १४ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने मान्यता दत्तने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत पती संजय दत्तला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये मान्यताने संजय दत्तचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मान्यताने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, संजय दत्त प्रेमाने त्याच्या बायकोचे पाय दाबताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ शेअर करत मान्यताने लिहिले की, माझे सर्व चांगले दिवस तुमच्यासोबत घालवले आहेत. तुम्ही ज्याप्रमाणे आहात त्यासाठी मी तुमच्यावर प्रेम करते. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा’. यासोबतच मान्यताने #blessed #love #grace #positivity #dutts #beautifullife #thankyougod असे अनेक हॅशटॅग पोस्ट केले आहेत.

मान्यता दत्तने शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहते खूप पसंती देत आहेत. तसेच यावर अनेकजण मजेशीर कमेंटसुद्धा करत आहेत. या पोस्टवर एक कमेंट करताना एकाने लिहिले की, ‘बाबा तुम्ही किती दयाळू आहात’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘संजय दत्त असो किंवा दुसरा कोणी शेवटी प्रत्येकाला बायकोचे पाय धरावेच लागतात’.

दरम्यान, संजय दत्त आणि मान्यताचे लग्न २००८ साली झाले होते. गोव्यात एका खासगी समारंभात दोघांचा विवाहसोहळा पार पडला होता. त्यानंतर दोन वर्षांनी मान्यताने एक मुलगा आणि मुलगी अशा दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. २१ ऑक्टोबर २०१० रोजी त्यांच्या अपत्यांचे जन्म झाले असून शाहरान आणि इकरा अशी त्यांची नावे आहेत.

मान्यता दत्त एक अभिनेत्री असून तिला सिनेसृष्टीत सारा खान या नावाने ओळखले जात होते. मात्र, नंतर तिने नाव बदलून मान्यता केले. तिने प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ या चित्रपटात एक आयटम सॉन्ग केले होते. सध्या मान्यता संजय दत्तच्या प्रोडक्शन हाऊसची सीईओ म्हणून काम पाहत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
वडिलांच्या आठवणीत पुन्हा भावूक झाले अजिंक्य देव, ‘तो’ खास फोटो शेअर करत म्हणाले..
आलिया भट्टचा मोठा खुलासा; म्हणाली, रणबीरसोबत माझे लग्न कधीच झाले, मी त्याला माझा पती..
हिजाब वादावर कंगनाची प्रतिक्रिया; बिकिनीमध्ये बिचवरचा फोटो शेअर करत म्हणाली..

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now