सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत अनेक चांगले बदल झाले. अनेक नवनवीन कथा चाहत्यांच्या भेटीला आल्या आहे. सध्या छोट्या पडद्यावर अनेक नवीन कथा आल्या आहे. झी मराठी वाहिनीवर ‘मन झालं बाजिंद’ ही मालिका खूप कमी कालावधीत चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील अनेक भूमिका सध्या खूप गाजल्या आहे.
या मालिकेतील राया आणि कृष्णाची भूमिका खूप गाजली आहेत. यामध्ये कृष्णाची भूमिका श्वेता खरात ही साकारत आहे. तर रायाची भूमिका वैभव चव्हाण साकारत आहे. राया आणि कृष्णाच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले आहे. त्याचबरोबर त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली आहे. नुकताच मालिकेत व्हॅलेंटाईन डे साजरा झाला.
सध्या श्वेता ही प्रेक्षकांची लाडकी झाली आहे. तिच्या या भूमिकेने सध्या ती प्रकाशझोतात आहे. त्याचबरोबर तिच्या चाहत्या वर्गातही मोठी वाढ झाली आहे. श्वेताने नुकतीच नवीन कार घेतली आहे. सोशल मीडियावर तिने नवीन गाडीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याचबरोबर कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘माय न्यू बेबी इन द हाऊस.’
नवीन कार घेतल्याबद्दल सध्या ती खूप खुश आहे. तिच्या चेहऱ्यावर नवीन कारचा आनंद दिसून येत आहे. सध्या तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबर श्वेताला काही कलाकार मंडळीनी ही नवीन कारसाठी शुभेच्छा देत आहेत.
श्वेताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती ‘मन झालं बाजिंद’ मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. या अगोदर श्वेता ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत अभिनेत्रीच्या खास मैत्रिणीची भूमिका साकारली होती. श्वेता ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
श्वेता सोशल मीडियावर नेहमी व्हिडिओ पोस्ट करत असते. ‘लागिर झालं जी’ या मालिकेतील आज्या उर्फ अभिनेता नितीश चव्हाण सोबत नेहमी व्हिडिओ शेअर करत असते. त्याचबरोबर ‘घेतला वसा टाकू नको’ या मालिकेत भगवान शंकराच्या पौराणिक कथेतील महालक्ष्मीची भूमिका साकारली आहे.