Share

Nana patole : ‘मोदींनी आणलेल्या चित्त्यांमुळे ‘लम्पी’ आजार पसरला’; नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये ‘लम्पी’ या आजाराची साथ प्रचंड पसरली आहे. या आजाराची लागण गाय, बैल, म्हैस या जनावरांना होत आहे. सध्या या लम्पी रोगाच्या उच्चाटनासाठी प्रयत्न सुरू आहेत. रोगाचा संसर्ग जनावरांमध्ये पसरू नये यासाठीही काळजी घेतली जात आहे.

अशातच आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या लम्पी रोगाबाबत अजब वक्तव्य केलं आहे. त्यांनी  लम्पी रोगासाठी मोदी सरकारला जबाबदार धरलं आहे. लम्पी हा आजार मोदींनी नायजेरियातून आणलेल्या चित्त्यांमुळे झाला असं विधान नाना पटोले यांनी केले आहे.

नाना पटोले म्हणाले, लम्पी हा आजार नायजेरियातून आला आहे. देशात चित्तेही नायजेरियातून आणले आहेत. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावरचे ठिपके सारखेच आहेत. मोदी सरकारने जाणूनबुजून शेतकऱ्यांचं नुकसान चित्त्यांना भारतात आणलं, असं विधान पटोले यांनी केलं.

एएनआय या वृत्तसंस्थेशी फोनवर बोलताना नाना पटोले म्हणाले, ‘पंतप्रधानांनी काळे कायदे (शेती कायदे) मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यांशी कधीच बोलले नाहीत. उलट ते नामिबियातून चित्ते आणून याचा बदला घेत आहेत. चित्त्यांमुळंच लम्पी व्हायरस भारतात आला’.

तसेच म्हणाले, माझ्या ५५ वर्षात असा आजार मी पाहिला नाही आणि माझ्या पूर्वजांनाही तो माहिती नव्हता. हा आजार भारतात जाणूनबुजून आणला आहे जेणेकरून शेतकर्‍यांचं नुकसान होईल. भारतात आणलेल्या चित्त्यांवरील डाग आणि गायींवर गोचिड सारखेच आहेत. हा रोग नामिबियामध्ये आधीच अस्तित्वात होता आणि आता तो भारतात पसरला आहे.

https://twitter.com/ani_digital/status/1576950135359442944?t=AaEi5up2sXtzN29h1D0KHA&s=19

नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विट करत उत्तर दिलं आहे. म्हणाले, नाना पटोलेजी चित्ते नामिबियातून आणले आहेत, नायजेरियातून नाही. असं म्हणत हात जोडणारा इमोजीही त्यांनी यासोबत जोडला आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now