लाऊडस्पीकर उतरवण्यावरून महाराष्ट्रात गदारोळ पाहायला मिळत आहे. तसेच लाऊडस्पीकरच्या मुद्यावरून राजकारण तापलं आहे. मात्र उत्तर प्रदेशमध्ये लोकांनी स्वत:हून लाऊडस्पीकर उतरवले आहेत. तब्बल २५ ठिकाणी लाऊडस्पीकर आणि भोंगे हटविण्यात आले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. देशातील आणि राज्यातील मशिदींवरील सर्व भोंगे 3 मे पर्यंत उतरवा, आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही, असे सांगत राज यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. जर मशिदींवरचे भोंगे उतरवले नाही तर, हनुमान चालीसा लावणारचं असेदेखील राज यांनी स्पष्ट केले.
मात्र उत्तर प्रदेशमध्ये चित्र काहीस वेगळं पाहायला मिळालं. उत्तर प्रदेशात योगी सरकारच्या एका आदेशानंतर धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या १७ हजार लाऊडस्पीकरचा आवाज कमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे एडीजी प्रशांत कुमार यांनी माहिती दिली.
याबाबत प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ हजार ठिकाणी लोकांनी स्वत:हून भोंगे आणि लाऊडस्पीकरचा आवाज कमी केला आहे. राज्यात १२५ ठिकाणी लाऊडस्पीकर उतरविण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ते याबाबत माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, योगी सरकारने देखील याबाबत काही आदेश दिले आहे. राज्यातील सर्व धार्मिक आयोजनांमध्ये आणि धार्मिक स्थळांवर शांतता कायम ठेवण्यासाठी परवानगीविना कुणालीही मिरवणूक काढता येणार नसल्याचे आदेश नागरिकांना देण्यात आले आहे.
याचबरोबर धार्मिक कार्यक्रमावेळी अशा स्थळांमध्ये लावण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरमुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचेही आदेश योगी सरकारनं दिले आहेत. दरम्यान, कानपूर, लखनौ, नोएडा आणि इतर शहरांमध्येही धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले स्पीकर हटविण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
‘मी हिच्यासाठी मरत आहे’; प्रेयसीचा फोटो ठेऊन स्टेटस टाकले अन् मृत्यूला कवटाळले
राणा दाम्पत्याला दुसऱ्या दिवशीही कोर्टाने झापले; म्हणाले, दुसऱ्याच्या घराबाहेर….
२४ तास एसी, कूलर, पंखे चालवूनही वीज बिल निम्म्यावर येणार, वापरा ‘या’ खास Tricks
नवनीत राणांना पोलीस कोठडीत अमानुष वागणूक दिल्याच्या आरोपांवर गृहमंत्री स्पष्टच बोलले, म्हणाले…