Amitabh Bachchan: लाईफलाईन वापरूनही या प्रश्नाचे दिले चुकीचे उत्तर, लेफ्टनंट कर्नलचे झाले ६ लाख ४० हजारांचे नुकसान

Amitabh Bachchan, Colonel Girish Tandon, Rodrigo Duterte, Video/ क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती 14’ (Kaun Banega Crorepati 14) सध्या चर्चेत आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे प्रत्येक सीझनप्रमाणे होस्ट करत आहेत. शोमध्ये, देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध व्यवसायातील लोक KBC 14 मध्ये येत आहेत आणि त्यांचे ज्ञान सिद्ध करत आहेत, त्याचसोबत प्रचंड पैसा जिंकत आहेत.

शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये एक खास स्पर्धकही आला होता. मात्र, त्याला शोमधून जास्त पैसे घरी नेता आले नाहीत. लाइफलाइनचा वापर करूनही त्याने चुकीचे उत्तर दिले. ‘कौन बनेगा करोडपती 14’ च्या शेवटच्या एपिसोडमध्ये लेफ्टनंट कर्नल गिरीश टंडन हॉटसीटवर बसला होता.

बिग बींनी त्याची ओळख करून दिली आणि खेळ सुरू केला. त्याने चांगला खेळ खेळला. मात्र, बिग बींनी त्याला 6 लाख 40 हजार रुपयांचा प्रश्न विचारला असता तो अडखळला. लेफ्टनंट कर्नल खूप चांगला खेळत होता. त्याने 3 लाख 20 हजार रुपये जिंकले होते. मात्र, तो 6 लाख 40 हजार रुपयांच्या प्रश्नाचे तो उत्तर देऊ शकला नाही.

प्रश्न होता- रॉड्रिगो दुतेर्ते यांची 2022 मध्ये फिलीपिन्सच्या राष्ट्राध्यक्षपदी जागा कोणी घेतली?
दिलेले पर्याय होते, A- लेनी रोब्रेडो, B- मैनी पैकियाओ, C- फर्डिनेंड मार्कोस जूनियर, D- इस्को मोरेनो. बरोबर उत्तर आहे A- लेनी रोब्रेडो.

या प्रश्नाचे उत्तर देताना स्पर्धक थोडा गोंधळला. त्याची ‘व्हिडिओ कॉल’ लाईफलाईन होती. त्याने त्याच्या मित्राला व्हिडिओ कॉल केला, पण त्याच्या मित्राला योग्य उत्तर माहित नव्हते. यानंतर, स्पर्धकानी पर्याय डी अर्थात इस्को मोरेनोचे उत्तर लॉक केले, परंतु ते चुकीचे आहे. योग्य उत्तर लेनी रॉब्रेडो आहे. स्पर्धकाला खेळ सोडवा लागला. त्याला 3 लाख 20 हजार रुपयांचे बक्षीस घेऊन घरी परतावे लागले.

महत्वाच्या बातम्या-
IAS अधिकाऱ्याने शेअर केला अमिताभ यांचा ‘तो’ जुना व्हिडीओ, कॅप्शनमध्ये लिहीलं, ‘कोण मोठं आहे?’
KBC मध्ये 5 कोटी जिंकून रातोरात श्रीमंत झाला होता ‘हा’ व्यक्ती, आता झाली आहे अशी अवस्था
KBC मध्ये ‘या’ अवघड प्रश्नाचं उत्तर देऊन जिंकले तब्बल १ कोटी? तुम्हाला माहिती आहे प्रश्नाचं उत्तर माहिती आहे का त्या प्रश्नाच उत्तर?