Share

LPG गॅस सिलिंडरच्या किंमतीत झाली घसरण, पाहा नवे दर…

केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सादर होण्यापूर्वी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मंगळवारी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. राष्ट्रीय तेल विपणन कंपन्यांनी कालपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी(LPG) सिलिंडरच्या किमती 91.50 रुपयांनी कमी केल्या आहेत.

तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 91.50 रुपयांनी मोठी कपात केल्यामुळे आता दिल्लीतील व्यावसायिक गॅस सिलिंडर 1907 रुपयांचा झाला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी 19 किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत 102.50 रुपयांनी कपात केली होती, मात्र त्यावेळी सिलिंडरची किंमत 2000 रुपयांपेक्षा जास्त होती.

गेल्या महिन्यात म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला देखील तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या दरात 102.50 रुपये प्रति सिलेंडर कपात केली होती, तर 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नव्हता.

विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर ऑक्टोबरपासून त्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्याचवेळी नोव्हेंबरपासून डिझेल-पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. याचे एक मोठे कारण म्हणजे यूपी, उत्तराखंड, पंजाबसह 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका. अशा स्थितीत किमान निवडणुका होईपर्यंत ना डिझेल-पेट्रोलचे दर वाढतील, ना गॅस सिलिंडरचे दर वाढतील, असे सांगितले जाते.

1 फेब्रुवारीपासून दिल्लीत अनुदानाशिवाय 14.2 किलोच्या इंडेन गॅस सिलिंडरची किंमत 899.50 रुपये झाली. त्याच वेळी, कोलकातामध्ये गॅस सिलेंडरची किंमत 926 रुपये झाली. मुंबईत, विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 899.50 रुपये झाली.तर चेन्नईमध्ये सध्या त्याची किंमत 915.50 रुपये झाली.

इंधनाबाबत बोलायचे झाल्यास, गेल्या 90 दिवसांपासून तेल विपणन कंपन्यांनी इंधनाच्या दरात बदल केलेला नाही. त्याचवेळी कच्च्या तेलाचे दर सात वर्षांच्या विक्रमी उच्चांकावर पोहचला आहे. सोमवारच्या व्यवहारात कच्च्या तेलात कमालीची वाढ दिसून आली. जागतिक मानक मानले जाणारे ब्रेंट क्रूड 1.30 टक्क्यांनी वाढून 91.20 डॉलर प्रति बॅरल झाले. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड फ्युचर्स 0.87 टक्क्यांनी वाढून 90.81 डॉलर प्रति बॅरल झाले.

इतर आर्थिक

Join WhatsApp

Join Now