बिहारच्या मधुबनीमध्ये एका महिलेने आपल्याच पतीसोबत मिळून प्रियकराला मारुन टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण मधुबनी हादरले आहे. एक तरुण आपल्या शेजारी राहणाऱ्या तीन मुलांच्या आईच्या प्रेमात पडला होता. यानंतर महिलेनेही तरुणाला होकार दिला. या दोघांमध्ये भेटीगाठी होऊ लागल्या.
पती कामाल गेल्यानंतर महिला तरुणाला भेटण्यासाठी येई. एकेदिवशी महिलेने तरुणाला मध्यरात्री भेटण्यासाठी बोलविले. तरुणही कसला विचार न करता भेटण्यासाठी आला. मध्यरात्री कोणी नसताना या दोघांचा रोमान्स सुरु होता. दुसरीकडे पत्नीच्या वागण्यावर पतीला अगोदरच शक आला होता. त्यामुळे पती महिलेचा पाठलाग करत होता.
ज्यावेळी पतीने महिलेला तरुणाच्या मिठीत पाहिले तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पतीने या तरुणावर हल्ला केला. यानंतरच महिलेने देखील तरुणाला मारुन टाकण्यास पतीला मदत केली. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अनिल कुमार महतो असे आहे.
अनिलची हत्या झाल्यामुळे कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन पोलिसांनी आपला तपास सुरु केला होता. गेले चार दिवस पोलीस या घटनेचा तपास करीत होते. मात्र त्यांच्या हाती काही पुरावे लागत नव्हते. मात्र एकेदिवशी तरुणाचे शेजारील महिलेसोबत अफेर चालू असल्याची माहिती पोलिसांना लागली.
यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. तसेच चौकशीसोठी पतीलाही बोलवण्यात आले. यावेळेच या दोघांनी आपला गुन्हा कबूल केला. समोर आलेल्या माहितीनुसार, एकेदिवशी तरुणासोबत बोलताना पतीने आपल्या पत्नीला पाहिले होते. तेव्हापासून तो तिच्यावर नजर ठेवून होता. यातच त्याला या दोघांच्या भेटण्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पतीही घटना स्थळी पोहचला. त्याने तरुणावर संतप्त होऊन हल्ला केला. यावेळी महिलेला काय करावे हे सुचले नाही तिनेही पतीसोबत तरुणाचा गळा दाबला. यानंतर या दोघांनी मिळून तरुणाचा मृतदेह गावाबाहेर फेकला. महिलेने तरुणासोबत लग्न करण्याचे वचन दिले होते. पतीसोबत वाद होत असल्यामुळे महिला तरुणाकडे आकर्षित झाली.
या दोघांच्या नातेसंबंधांना पाच वर्षे होऊन गेली होती. मात्र तरी देखील याची खबर पतीला नव्हती. ज्यावेळी समजले. तेव्हा पतीने टोकाचे पाऊल उचलले. आता या दोघांना बिहार पोलिसांनी अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या
रतन टाटांना भारतरत्न देण्याच्या याचिकेवर जज संतापले, म्हणाले, आम्ही या प्रकरणात कोणताही…
शरद पवारांच्या टीकेला विवेक अग्निहोत्रींनी दिले प्रत्यु्त्तर, म्हणाले, ‘हा तर शरद पवारांचा ढोंगीपणा’
आता हसन मुश्रीफ यांचा नंबर? किरीट सोमय्यांचे ट्विट चर्चेत, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
१०० करोड खर्च, १५ हजार पाहुणे, १ करोडची वधूची साडी, ‘असा’ पार पडला होता ज्युनिअर NTR चा विवाहसोहळा