love story : डायलिसिसच्या त्रासामुळे खुप वैतागला होता पती, पत्नीने स्वत:ची किडनी देत त्रासातून केली सुटका

love story wife who donate kidney to husband  | खरं प्रेम असेल, तर त्या प्रेमासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. चित्रपटात अनेकदा प्रेमासाठी आपण जीव देऊ शकतो, असे हिरो-हिरोईन एकमेकांना म्हणताना दिसून येत असतात. पण आता अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे एका पत्नीने आपल्या पतीसाठी जे केलं आहे, ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

एका वृद्ध महिलेने तिच्या आजारी पतीला किडनी दान केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ती चांगलीच चर्चेत आली आहे. आजारी पतीची ९८ डायलिसिसचे सेशन झाले होते. ही महिला आपल्या पतीसोबत आठवड्यातून तीन वेळा डायलिसिससाठी जात होती आणि हॉस्पिटलमध्ये ५-६ तास थांबली होती.

आपल्या पतीला त्रासात पाहून पत्नीलाही खुप त्रास होत होता. त्यामुळे हा त्रास संपवण्यासाठी पत्नीने किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दाम्पत्यासाठी ही प्रक्रिया सोपी नव्हती कारण किडनी जुळण्यासाठी मान्यता आणि चाचणीसाठी जवळपास दोन महिने लागले.

फोटो शेअर करताना लिओ नावाच्या ट्विटर यूजरने लिहिले की, वडिलांना ९८ डायलिसिस सेशन करावे लागले आणि आई आठवड्यातून ३ दिवस त्यांच्यासोबत ५-६ तास त्यांच्यासोबत जायची. त्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी आपली किडनी दान केली आणि आता ते दोघेही ते या त्रासातून बाहेर आले आहे. इतके चांगले प्रेम आतापर्यंत बघितले नाही.

पोस्टमध्ये पहिल्या फोटोमध्ये हेमोडायलिसिस युनिटचे गेट दाखवण्यात आले आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये जोडप्याचा सेल्फी घेताना दिसत आहे. १९ ऑक्टोबर रोजी ट्विटरवर शेअर केल्यापासून, पोस्टला १३०० हून अधिक लाईक्स आणि १०० हून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत.

ही पोस्ट वाचून अनेकजण भावूक झाले, तर काहींच्या डोळ्यात पाणी आले. सोशल मीडियावर शेकडो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने लिहिले की, हे खूप भारी आहे. आणखी एक युजर भावूक झाला आणि लिहिले, किती अद्भुत, तुमच्या पालकांना शुभेच्छा, त्यांची गोष्ट शेअर केल्याबद्दल धन्यवाद. तर एकाने लिहिले की हे जगातील सर्वात क्युट कपल आहे.

महत्वाच्या बातम्या-
भारताकडून हरल्यानंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममधील ‘तो’ व्हिडिओ तुफान व्हायरल
Virat Kohli : सामना जिंकवून आल्यानंतर खुपच भावूक झाला विराट, लहान मुलाप्रमाणे द्रविडला मारली मिठी; व्हिडिओ व्हायरल
shivsena : राजकीय भूकंप! शरद पवारांचा विश्वासू पक्षाला सोडचिठ्ठी देणार, वाचा नेमकं काय घडलंय?