Share

परीक्षेच्या दिवशीच आईला गमावलं, पण फक्त आईसाठी रडत रडत दिला पेपर आणि मिळवले 96%

JEE Mains 2022 चा निकाल 11 जुलै रोजी जाहीर झाला. या परीक्षेत मुलांच्या मेहनतीचे फळ मिळाले. पण एका बातमीने सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. ही बातमी आहे 19 वर्षीय अवुला दुर्गा प्रसादची.(lost-mother-on-exam-day-itself-but-passed-paper-crying-only-for-mother)

ज्याने JEE Mains 2022 मध्ये आपले नशीब बदलले, पण हृदयावर दगड ठेवून. दुर्गा प्रसादला(Durga Prasad) जेईईमध्ये 96.48 टक्के गुण मिळाले आहेत. तेलंगणा राज्यात तो अव्वल ठरला आहे. पण ज्या परिस्थितीतून त्याने ही परीक्षा दिली, त्यावरून नशीब कोणीही टाळू शकत नाही, हेच सिद्ध होते. जे व्हायचे ते घडते.

वास्तविक, ज्या दिवशी दुर्गाप्रसादची परीक्षा होती, त्या दिवशी त्याच्या घरी शोककळा पसरली होती. परीक्षेच्याच दिवशी त्याने आई नरसम्मा(Narsamma) गमावली. आई गमावल्याचं दु:ख त्याच्या मनावर पसरलं होतं. आई गमावण्याचे दु:ख तेच समजू शकतात ज्यांनी आई गमावली आहे.

परीक्षेच्या(Exam) दिवशीच त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण त्याने फक्त आईसाठी JEE परीक्षा दिली आणि परिणामी त्याला आईचे आशीर्वाद मिळाले. मुलाला परीक्षेत 96 टक्के गुण मिळाले.

दुर्गाप्रसाद याच्या घरची परिस्थिती चांगली नव्हती. त्याला त्याच्या पालकांनी अभ्यासासाठी खूप पाठिंबा दिला, विशेषतः त्याच्या आईने त्याला खूप धीर दिला. मुलानेही आई-वडिलांच्या विश्वासावर खरा उतरून एसएससीमध्ये पर्सेंटाइल आणि इंटरमिजिएटमध्ये 940 गुण मिळवले.

त्यानंतर जेईई हे उद्दिष्ट होते. आता त्याने जेईई पास केली आहे. इंटरनेटच्या मदतीने अभ्यास केला आणि यश मिळविले. या यशाचे श्रेय तो त्याच्या आईला देतो आणित्या ला मोठे होऊन आयएएस(IAS) अधिकारी व्हायचे आहे.

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now