Share

भाजप मंत्री लोढांचे मुख्यमंत्री शिंदेंच्या समोरच शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान; महाराष्ट्रात संतापाची आग

mangalprabhat lodha

मुंबई : मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. त्यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी निषेध केला आहे. औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होतं पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील कुणीतरी डांबून ठेवलं होतं पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले.

त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. आता मंगलप्रभात लोढांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेली नाही. फक्त घडलेल्या घटनेची तुलना केली. मंगलप्रभात लोढा म्हणाले की, मी फक्त त्या बाबतीत समानता दाखवण्याचा प्रयत्न करत होतो.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गडकरींची तुलना शिवरायांशी केली. यावरून सध्या वाद सुरू आहे. विरोधक राज्यपालांना पदावरून हटवण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी हालचाली सुरू आहेत.

त्याचवेळी भाजपच्या आणखी एका मोठ्या नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. लोढा यांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून टीका होत आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही लोढा यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. वादग्रस्त बोलणाऱ्यांना आवरा असं मी त्यांना म्हणतो पण कोण जास्त वादग्रस्त विधाने करतोय यावरून त्यांच्यात चढाओढ सुरू आहे. एकनाथ शिंदे मंचावर असताना शिवरायांचा अपमान करणे अत्यंत चुकीचे असल्याचे अजित पवार म्हणाले.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारले असता त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. शिवरायांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात अडकत असतात. नुकतीच त्यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. त्यामुळे ते वादात अडकले आहे.

राज्यभरातून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी निषेध केला जात आहे. तर काही ठिकाणी त्यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहे. त्यामुळे ते मोठ्या अडचणीत सापडले आहे. अशात त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे.

भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांना राज्यपाल पदावरुन हटवा अशी  याचिका दाखल करण्यात आली आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचा अवमान केल्याचे याचिकेत म्हटले आहे.

एका कार्यक्रमात बोलताना भगतसिंग कोश्यारी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आहे. पण आताच्या काळात बाबासाहेब आंबेडकरांपासून नितीन गडकरी हे आदर्श आहे, असे भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-
ruturaj gaikwad : अभिनेत्री सायलीच्या पोस्टवर ऋतुराजच्या चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स; म्हणाले, वहिनी मॅच पाहिली का? भावाने…
Akola : रुढी-परंपरा तोडत दिराने केलं वहिणीशी लग्न, दिवंगत भावाचं कर्जही घेतलं आपल्या डोक्यावर
विनोद कांबळी होणार टिम इंडीयाच्या निवड समितीचा अध्यक्ष?

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now