Share

‘राणांचे तुरुंगातील अनुभव ऐकूण मला इंग्रजांच्या काळातील तुरुंगाची आठवण झाली’- किरीट सोमय्या

राणा दाम्पत्याची काल तब्बल 12 दिवसांनी तुरुंगातून जामिनावर सुटका झाली आहे. तर दुसरीकडे नवनीत राणा यांना स्पॉडेलायटिसचा त्रास होऊ लागल्याने त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे. यावेळी, भाजप नेते किरीट सोमय्यांनी रूग्णालयात जाऊन नवनीत राणा यांची भेट घेतली.

भेट झाल्यानंतर नवनीत राणा यांनी किरीट सोमय्यांना तुरुंगातील अनुभव सांगितला. तो ऐकल्यानंतर मला इंग्रजांची आठवण झाल्याचे भाजप नेते किरीट सोमय्यांनी म्हटले आहे. तसेच रवी राणा देखील या सर्व प्रकरणात मानसिकदृष्ट्या खचले असल्याचे सोमय्यांनी यावेळी सांगितले.

सोमय्या यांनी नवनीत राणा भेटीनंतर माध्यमांशी संपर्क साधला. म्हणाले, नवनीत राणांना सपॉडेलायटीसचा त्रास आधीपासूनच होता. परंतु, त्यांना ज्या पद्धतीने फरसीवर झोपवले, चौकशीसाठी बसवून ठेवले त्यामुळे त्यांचा त्रास अधिक बळावला असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.

तसेच म्हणाले, तुरुंगातून सुटका होताच रवी राणा यांनी लीलावतीमध्ये धाव घेत पत्नी नवनीत राणा यांची भेट घेतली त्यावेळी दोघांच्याही डोळ्यात आश्रू होते, हे आश्रू पत्नीच्या प्रकृतीच्या काळजीपोटी होते. त्या दोघांचा तुरुंगातील अनुभव ऐकल्यानंतर राज्यातील या माफिया सरकारच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी देवो ही अपेक्षा असल्याचे सोमय्यांनी यावेळी सांगितले.

सोमय्या म्हणाले, नवनीत राणा यांच्या संपूर्ण चाचण्या करण्यास सांगितले असून, त्यांच्यावर आवश्यक ते उपचार सुरु करण्यात आले आहेत. रवी राणा यांना रूग्णालयात दाखल होण्याची जरी गरज नसली तरी घडलेल्या या सर्व प्रकारानंतर त्यांना देखील खूप मोठा धक्का बसला आहे. म्हणाले, राणांचे तुरुंगातील अनुभव ऐकूण मला इंग्रजांच्या काळातील तुरुंगाची आठवण झाली.

दरम्यान, राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाजविण्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी त्यांना त्यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर रोखले होते. शेवटी राणा दाम्पत्यांनी अमरावतीला परत जाण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now