Share

एलपीजी सिलेंडरमधून गॅसऐवजी निघाल्या दारूच्या बाटल्या, तस्करांचा जुगाड पाहून पोलीसही हैराण, पाहा VIDEO

दारूची तस्करी करण्यासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबले जात असतात. आता समोर जी घटना आली आहे, त्यात बेकायदेशीरपणे दारूची तस्करी करणाऱ्या तस्कराचा जुगाड पाहून पोलीस देखील चक्रावले आहेत. दारू तस्कराने चक्क एलपीजी सिलेंडर मधून दारूची तस्करी केली आहे.

संबंधित घटना ही बिहारमधील आहे. बिहारमध्ये दारूबंदी लागू करण्यात आली आहे. तरीदेखील बेकायदेशीरपणे मद्यविक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येते. त्यातच एका तस्कराने जी पद्धत अवलंबली आहे , पाहून पोलीस देखील चक्रावले आहेत. दारू तस्करांनी थेट एलपीजीच्या सिलेंडरमध्ये दारूच्या बाटल्या लपवल्याचे उघडकीस आले आहे.

संबंधित एका दारू तस्कराला पाटणामध्ये पीरबहोर पोलीसांनी अटक केली आहे. याचं नाव भूषण असून, तो सोनपूर येथील रहिवासी आहे. त्याच्याजवळून 44 लीटर देशी दारू जप्त करण्यात आली. कोणालाही संशय येऊ नये असा जुगाड या दारू तस्कराने केला होता.

दारू तस्करी करणारा भूषण एलपीजी सिलेंडरमध्ये देशी दारू घेऊन पाटणा येथे जात होता. पोलिसांना दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच त्यांनी सगळीकडे चौकशीसाठी पोलीस लावले होते. त्यानंतर सोनपूर येथून एका नावेतून एक व्यक्ती उतरली. तिची हालचाल पोलिसांना संशयास्पद वाटली.

हा संशयास्पद व्यक्ती भूषण होता. पोलिसांनी त्याच्या जवळील घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची तपासणी केली. सिलेंडरच्या खालील बाजूस झाकण लावण्यात आले होते. हे झाकण उघडल्यानंतर पोलिसांना धक्का बसला. पोलिसांना शीतपेयांच्या प्लास्टीकच्या बाटलीत देशी दारू असल्याचे आढळून आले.

यात एकूण 44 लीटर देशी दारू होती. पोलिसांकडून आरोपी भूषणची कसून चौकशी सुरू आहे. मागील किती दिवसांपासून हे काम करत आहे, आणखी किती जणांचा सहभाग आहे, आदी चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. मात्र दिवसेंदिवस बिहारमध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे.

क्राईम

Join WhatsApp

Join Now