फेसबुकची मैत्री भोवली; गायछापचा वारसदार भासवून लावला चुना, वाचा नेमकं प्रकरण काय?

अलीकडे सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इंटरनेटमुळे आख्खं जग आपल्या मुठीत आलं आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात आपण येतं असतो. अनेकदा त्यातूनच मैत्री होते, अन् धक्कादायक घटना घडतात.

अलीकडे अशाच प्रकारे अनेक फुसवणुकीच्या घटना घडल्याचे उघडकीस येतं आहे. असाच एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. फेसबुकवर केलेली अनोळखी व्यक्तीशी ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली आहे. या महिलेला तब्बल ९३ लाखांचा चुना लागला आहे.

अखेर महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांना घडल्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली. तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय? हि घटना नवी मुंबई येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. नवी मुंबई येथील सानपाडा येथे राहणाऱ्या जमुना वडगाये यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्या बदलापूर नगरपरिषदेचे लेखा विभागातील सहायक संचालक प्रवीण वडगाये यांच्या पत्नी आहेत. २०१९ मध्ये त्यांची फेसबुकवर एका तरुणासोबत ओळख झाली होती. गायछाप कंपनीच्या मालकाचा मुलगा असल्याचे भासवून जमुना यांना या तरुणाने ९३ लाखांचा चुना लावला आहे.

त्याचं झालं असं… . २०१९ मध्ये जमुना यांची फेसबुकवर एका तरुणासोबत ओळख झाली होती. त्या तरुणाने जमुना यांना तो गायछाप कंपनीच्या मालकाचा मुलगा असल्याचे सांगितले. त्याने स्वतःचे नाव द्रिश मालपाणी असे सांगितले. हळूहळू फेसबुकवर त्यांच्यात बोलण झाले, ओळख वाढली.

त्यानंतर त्या तरुणाने संपत्तीवरून वडिलांसोबत आपला वाद झाला असून, तो वेगळा राहत असल्याचे सांगितले. मात्र, आपण पुण्यात क्लब सुरू करणार असून त्यात पैसे गुंतवल्यास दोन वर्षांत दुप्पट रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले. त्याच्यावर विश्वास ठेवून जमुना यांनी रोख व दागिन्यांची मोड करून ९३ लाख १६ हजार रुपये द्रिश या तरुणाला दिले.

त्यानंतर जमुना यांचे पैसे परत करण्यात तो टाळाटाळ करू लागला. हे जमुना यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याचा पाठपुरावा केला असता, त्याने फेसबुक व मोबाइलवर ब्लॉक करून संपर्क तोडला. त्यानंतर जमुना यांनी याप्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
‘शालेय अभ्यासक्रमात बदल करून भाजप मुलांच्या मनात विष पेरत आहे’ – शरद पवार
अबब! विसावलेल्या कोब्र्याला तरुणाने घातली अंघोळ, फिरवला डोक्यावरून हात; थरारक व्हिडिओ व्हायरल
पतीला झालेल्या कॅन्सरविषयी अभिज्ञा भावेने दिली मोठी अपडेट; भावूक होत म्हणाली…
ज्या मित्रासाठी बदलले लिंग, ‘रवीचा बनला रिया’, त्यानेच दिला धोका; लव्हस्टोरी वाचून हादराल