क्रिकेटपटू केवळ त्यांच्या खेळामुळेच नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असतात. चाहते देखील सोशल मीडियावर क्रिकेटपटूंच्या गर्लफ्रेंड किंवा पत्नीला प्रचंड फॉलो करतात. पण तुम्हाला माहित आहे का की क्रिकेट खेळणारे काही खेळाडू असे आहेत ज्यांना त्यांच्या पत्नींनी घटस्फोट देऊन इतर खेळाडूंशी लग्न केले आहे. आम्ही तुम्हाला अशा तीन खेळाडूंबद्दल सांगणार आहोत.(Cricketer, Dinesh Karthik, Nikita Vanjara, Divorce)

जेव्हा-जेव्हा क्रिकेटरची पत्नीने फसवणूक केल्याची चर्चा होते, तेव्हा दिनेश कार्तिकचे नाव नेहमीच प्रथम घेतले जाते. सध्या टीम इंडियाची सर्वात मोठी फिनिशर मानली जाणारी दिनेश कार्तिकची पहिली पत्नी निकिता वंजारा हिने त्याला फसवून टीम इंडियाचा फलंदाज मुरली विजयसोबत लग्न केले होते. पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर दिनेश कार्तिकने भारतीय स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलशी लग्न केले. आता हे जोडपे एकमेकांसोबत आनंदी जीवन जगत आहे.

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज ब्रेटलीलाही त्याच्या पत्नीने फसवले होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे लीच्या पत्नीचे लग्न क्रिकेटपटूशी नाही तर रग्बी खेळाडूशी झाले होते. सिडनी हेराल्डमधील एका वृत्तानुसार, ब्रेट लीला त्याच्या पहिल्या पत्नीने घटस्फोट दिला होता कारण ली त्याच्या खेळात खूप व्यस्त असल्यामुळे आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही असा तिचा आरोप होता.

श्रीलंकेचा दिग्गज सलामीवीर तिलकरत्ने दिलशानची पत्नी निलंका विथांगे हिनेही त्याला सोडून दुसऱ्या क्रिकेटपटूशी लग्न केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिलशानच्या पत्नीने त्याचा सहकारी आणि दिलशानसोबत दीर्घकाळ सलामी देणाऱ्या उपुल थरंगाशी लग्न केले होते. या दोन फलंदाजांनी मिळून दीर्घकाळ श्रीलंकेसाठी ओपनिंगची जबाबदारी घेतली आहे. पण हे दोन्ही खेळाडू पर्सनल लाईफबद्दलही खूप चर्चेत होते.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, दिनेश कार्तिकने आयपीएल २०२२ मध्ये जबरदस्त कामगिरी केली आणि त्यानंतर तो भारतीय संघात परतला. त्याची प्रथम दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी संघात निवड झाली आणि त्यानंतर आयर्लंड मालिकेसाठीही त्याची संघात निवड करण्यात आली.
भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला T२० सामना पावसामुळे १२ ओवरचा झाला. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने १२ षटकांत ४ गडी गमावून १०८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने हे लक्ष्य १०व्या षटकात केवळ ३ गडी गमावून सहज गाठले. दीपक हुडाने जबरदस्त खेळी खेळली आणि अवघ्या २९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४७ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या-
नुपूर शर्माच्या पुतळ्याला फाशी दिल्याने क्रिकेटपटू व्यंकटेश संतापला; म्हणाला हे अति होतय..
नुपूर शर्माच्या पुतळ्याला फासावर दिल्यावर संतापला क्रिकेटपटू; म्हणाला, हा २१ व्या शतकातील भारत..
‘या’ क्रिकेटपटूने IPL मध्ये मिळालेले करोडो रूपये दिले वडीलांना; म्हणाला त्या पैशांपासून मला लांबच ठेवा
इन्स्टावर २० कोटी फॉलोवर्स असलेला विराट एकटाच क्रिकेटपटू, एका पोस्टसाठी घेतो तब्बल एवढे कोटी





