Share

खूपच रॉयल लाईफ जगते शिल्पा शेट्टी, दुबई, लंडनमध्ये आहे कोट्यवधींचे फ्लॅट; ‘इतक्या’ कोटींची आहे मालकीण

बॉलिवूडची ग्लॅमरस, बोल्ड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राचा आज वाढदिवस आहे. तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केल्यापासून आपल्या सौंदर्याने, बोल्ड अंदाजाने चाहत्यांना कायम आकर्षित केले आहे. शिल्पा अभिनयासोबत अनेक गोष्टींमधून पैसे कमावत आहे. ९०च्या दशकातील  ही अभिनेत्री आज पण लोकांच्या मनावर राज्य करते. आज वेगवेगळ्या क्षेत्रात कामं करून शिल्पा शेट्टी गडगंज संपत्तीची मालकीण आहे. (Life Lives Shilpa Shetty has billions of flats in..)

शिल्पा खूप रॉयल लाईफ जगते. तिचा जुहू येथे आलिशान बंगला आहे. त्याची किंमत तब्बल ६४ कोटी आहे. ‘किनारा’ असे त्या घराचे नाव आहे. त्यात सुंदर गार्डन आणि थिएटर पण आहे. शिल्पाचे लंडन येते एक घर आहे. त्याची किंमत ७ कोटी रुपये आहे. शिवाय इंग्लडमधील ‘वेयब्रेज’ या ठिकाणी ७ बेडरूमचा आलिशान फ्लॅट तिच्याकडे आहे.

शिल्पा शेट्टीचे दुबईत ‘बुर्ज खलिफा’वर घर आहे. त्याची तब्बल ५० कोटी एवढी किंमत आहे. ते घर शिल्पाला तिचा पती राज कुंद्राने लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट केले होते. ते घर आता तिने विकल्याची चर्चा आहे. याशिवाय दुबईत ‘जुमेराह’ या ठिकाणीसुद्धा तिचा एक फ्लॅट आहे.

तिच्याकडे स्वतःचे प्रायव्हेट जेट आहे. शिल्पा शेट्टीला तिच्या पतीने एक डायमंड रिंग गिफ्ट केली होती. त्या रिंगची किंमत ३ कोटी इतकी आहे. शिल्पा शेट्टीला महागड्या कार खूप आवडतात. तिच्याजवळ बीएमडब्ल्यू, रेन्जरोव्हर, मर्सिडिज-बेन्ज अशा अनेक आलिशान कार आहेत.

शिल्पा एका सिनेमात काम करण्यासाठी १ ते २ कोटी मानधन घेते. ती अनेक रिऍलिटी शोमध्ये जज म्हणून काम करताना दिसते. सुपर डान्सर ४, इंडियाज गॉट टॅलेन्ट, नच बलिये अशा अनेक रिऍलिटी शोचं जजिंग तिने केलं आहे. या कामातून तिची भरपूर कमाई होते. शिल्पा उत्तम डान्सर आहे. तिला योगाची फार आवड आहे. तिच्या पॉवर योगाची DVD पण बाजारात आली होती.

शिल्पा शेट्टी एक बिझनेस वुमन पण आहे. तिने रेस्टोरंट, स्पा, बार यामध्ये पैशांची मोठी गुंतवणूक केली आहे. आज शिल्पा शेट्टी १३४ कोटींची मालकीण आहे. योगा, व्यायाम यातून तिने आपली फिटनेस मेन्टेन केली आहे. आज ४७ वर्षांची झालेली शिल्पा नव्या तरुण अभिनेत्रींना पण फिटनेस बाबतीत टक्कर देते. धडकन हा तिचा सर्वाधिक गाजलेला सिनेमा आहे.

महत्वाच्या बातम्या –
‘त्या’ दिवशीच्या प्रदीप भिडेंच्या निवेदनाने अख्खा महाराष्ट्र रडला होता; काय होता तो प्रसंग? वाचा..
ना धोनी ना विराट, फक्त मिताली राजच्या नावावर आहे ‘हा’ रेकॉर्ड, मोडणे आहे कठीण
विधान परिषदेला डावलल्यानंतर पंकजा मुंडेंसाठी दिल्लीतून भाजपश्रेष्ठींचा आला ‘खास’ निरोप

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now