Share

सरकारला घाम फोडणारा विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊ आहे तरी कोण? त्याची एकूण कमाई किती?

hindustani bhau

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर परीक्षा ऑनलाईन घ्याव्या या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात हिंदुस्तानी भाऊचं (Hindustani Bhau) नाव पुढे आलं. आणि चर्चा सुरू झाली हिंदुस्तानी भाऊची. त्यानंतर हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यास भडकावल्याचा आरोप करण्यात आला.

कालच्या विद्यार्थी आंदोलनात पुढे आलेला हिंदुस्तानी भाऊ आता आणखी अडचणीत आला आहे. कारण हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी अटक करत कोर्टात हजर केलं आणि त्यांनंतर कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चला तर मग जाणून घेऊ या नक्की हिंदुस्तानी भाऊ करतो काय? त्याचे उत्पादनाचे सोर्स कोणते? त्या बद्दल सविस्तर…

विकास पाठक हा हिंदुस्थानी भाऊ नावाने सोशल मीडियात ओळखला जातो. हिंदुस्थानी भाऊचा जन्म ६ ऑगस्ट १९८३ रोजी झाला आहे. अंगावर सोन्याचे दागिने घालून संजय दत्तच्या आवेशात बोलणे ही त्याची स्टाइल आहे. बिग बॉसच्या १३ व्या पर्वातही तो सहभागी झाला होता.

विशेष बाब म्हणजे, युट्यूबवर प्रसिद्ध होण्याआधी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक एक पत्रकार होता. क्राईम रिपोर्टिंगसाठी २०११मध्ये विकास पाठकला पुरस्कारही मिळाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हिंदुस्थानी भाऊच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्याला सातवीत असतानाच वेटरची नोकरी करावी लागली होती. याशिवाय तो घरोघरी अगरबत्तीदेखील विकायचा.

दरम्यान, हिंदुस्थानी भाऊचे यूट्यूबवर ५.४० लाख सबस्क्रायबर्स आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो युट्यूबद्वारे वर्षाला ४० ते ५० लाख कमावतो. तसेच पाकिस्तान, दहशतवाद्यांना शिवराळ बोलून तो प्रसिद्धी मिळवत आहे. याचबरोबर त्याचे फेसबूक, इन्स्ट्राग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.

रम्यान, अखेर धारावी येथील विद्यार्थी आंदोलन आणि गर्दी प्रकरणी हिंदुस्तानी भाऊला (Hindustani Bhau) अटक करण्यात आलं आहे. धारावी पोलिसांनी काल रात्री उशिरा ही कारवाई केली आहे. विद्यार्थ्यांना (Student Protest) चिथावल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ही कारवाई करण्यात आहे. तसेच अटक केल्यानंतर हिंदुस्तानी भाऊला नायर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते.

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
ट्रक थांबवून पाणी आणायला गेलेला भाऊ परत आलाच नाही, शोध घेतल्यानंतर बसला जबर धक्का
हात जोडून उभ्या असलेल्या वृद्धाला पोलिसाने मारल्या लाथा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
महिला शिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्याशी बनवले शारीरिक संबंध; नंतर शिक्षेपासून वाचवण्यासाठी केले ‘हे’ लाजिरवाणे कृत्य
अनिल देशमुख यांचा मोठा गौप्यस्फोट; शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता द्यायचा पोलीस बदल्यांची यादी

क्राईम इतर राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now