Share

कोट्यवधी LIC धारकांना सुखद धक्का, ‘अदानी’च्या शेअर्सबाबत LIC ने दिली हैराण करणारी माहिती 

gautami adani lic

अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मोठा धक्का बसला आहे. हिंडनबर्गने अहवाल प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर अदानी समुहाच्या शेअर्सच्या किंमती मोठ्या प्रमाणात खाली आल्या आहे. त्यामुळे अदानींच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

अदानी समुहाला दोन लाख कोटींपेक्षा जास्तीचा तोटा झाला आहे. त्यामध्ये गोरगरीबांच्या भविष्याची तरतूद करणारी भारतीय आयुर्विमा निगम म्हणजेच एलआयसी कंपनीचे सुद्धा कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आता याबाबत एलआयसीने स्पष्टीकरण दिलं आहे.

अदानी उद्योग समुहाला आपण दिलेले कर्ज मर्यादेच्या आत आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचे देशातील एसबीआय बँकेने म्हटले आहे. अदानी समुहाचा अहवाल आल्यानंतरही एलआयसी आणि स्टेट बँकने कर्जपुरवठा सुरु ठेवल्याबाबत काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर यावर आता स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

एलआयसीने सोमवारी एक पत्र सादर केले आहे.  अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यानंतर एलआयसीला नुकसान झाले नसून कंपनीला फायदाच झाला आहे. एलआयसी सध्या २६ हजार कोटी रुपयांच्या फायद्यात आहे, असे त्या पत्रात म्हटले आहे.

एलआयसीने अदानी ग्रुपच्या सर्वच कंपन्यांमध्ये जवळपास ३०,१२७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. २७ जानेवारीनुसार एलआयसीच्या गुंतवणूकीची किंमत ५६,१४२ कोटी रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे अदानींच्या कंपनीत गुंतवणूक करुन एलआयसीचा फायदाच झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

२६,०१६ कोटी निव्वळ नका एलआयसीला मिळाला असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. तसेच स्टेट बँकेने सुद्धा यावर स्टेटमेंट दिले आहे. अदानी समुहाला दिलेले कर्ज हे लार्ज फ्रेमवर्कच्या मर्यादेत आहे. त्यामुळे त्यांना दिलेल्या कर्जात कोणताही धोका नाही, असे स्टेट बँकेने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
खाण्यासाठी बाजारातून मासे आणले; मासे कापतानाच समोर जी गोष्ट दिसली ते पाहून सगळेच हादरले
अभिनेता संदीप पाठकचा दिलदारपणा पाहून ढसाढसा रडू लागल्या वृद्ध आज्जी; पाहा अभिनेत्यानं केलं तरी काय..
वर्ल्ड चॅम्पियन बनताच BCCI ने मुलींच्या संघासाठी उघडला खजिना; प्रत्येकीला मिळणार ‘इतके’ करोड

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now