Share

उत्पल पर्रीकर हाती घेणार भगवा? सेनेच्या बड्या नेत्याच्या विधनाने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

udhav thackeray

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (utpal parrikar) यांनी भाजपला राम राम ठोकल्यानंतर गोव्यात एकच खळबळ उडाली आहे. भाजपने पणजीच्या मतदार संघातून तिकीट न दिल्यामुळे उत्पल पर्रीकर यांनी भाजपला सोडले आहे. आता ते पणजीतून अपक्ष लढणार आहे. (lets consider if utpal guarantees that he will not join bjp again sena leader uday samant)

‘निवडून आल्यानंतर उत्पल पर्रीकर पुन्हा भाजपमध्ये जाणार नाहीत याची हमी जर त्यांनी दिली तर त्यांना पाठिंबा देण्याबाबत विचार करू, असे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यामुळे उत्पल पर्रीकर हाती शिवबंधन बांधणार का? असा सवाल सध्या उपस्थित झाला आहे.

अशात उत्पल पर्रीकरांनी पक्षाला राम राम ठोकल्यानंतर भाजपने आता त्यांना विनंती केली आहे उत्पल पर्रीकरांनी फेरविचार करावा, असे भाजपने म्हटले आहे. उत्पल पर्रीकर हे भाजपच्या गोवा राज्य कार्यकारिणीचे सदस्य होते. त्यासह भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

उत्पल पर्रीकरांनी राजीमाना दिल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपने पणजी सोडून अन्य मतदार संघातले तिकीट देण्याची तयारी दर्शवली होती. त्यावेळी त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवण्यात आले होते. पण वडिलांनी पणजीचे प्रतिनिधित्व केले असल्यामुळे आपल्याला त्याच मतदार संघातून उमेदवारी हवी आहे, अशी मागणी उत्पल पर्रीकरांनी केली होती.

पणजीतून उमेदवारीची मागणी भाजपने धुडकावून लावली होती. त्यामुळे संतापलेल्या उत्पल पर्रीकरांनी तडकाफडकी राजीमाना दिला. त्यानंतर पक्षानेही त्यांचा राजीमाना मंजूर केला आहे. असे असतानाच भाजपचे सरचिटणीस सी टी रवी यांनी उत्पल पर्रीकरांना साद घातली आहे.

पक्ष सोडण्याचा जो निर्णय तुम्ही घेतला आहे, त्याचा विचार फेरविचार करा आणि वडिलांच्या इच्छेचा मान राखा, अशी विनंती रवी यांनी उत्पल पर्रीकरांना केली आहे. मनोहर पर्रीकर सतत भाजपला विजयी करण्यासाठी राबले झटले आहे. म्हणून माझी त्यांच्या मुलाला विनंती आहे की, त्यांनी स्वत:चा निर्णय बदलावा आणि वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी भाजपसोबत राहावे, असे आवाहन रवी यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
इजिप्शियन ममीच्या पोटात सापडलेल्या गर्भाचे गूढ उकलले, २००० वर्ष कसा राहिला सुरक्षित?
विद्यार्थीनीने शाळेतून घरी जाण्यास दिला नकार, शिक्षीकेने विचारपूस करताच झाला धक्कादायक खुलासा
विचित्र! ६ वर्षांच्या चिमुरडीच्या पोटात सापडला तब्बल दिड किलोचा केसांचा गुच्छ, डॉक्टरही हादरले
गरीब मुलांना ५०० च्या नोटा वाटणं नेहा कक्करला पडलं महागात, झाली भयानक अवस्था; पहा व्हिडिओ

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now