Share

‘मलाही केकेसारखा स्टेजवरच मृत्यु यावा’, प्रसिद्ध गायिकेने व्यक्त केली इच्छा, चाहतेही हैराण

केके यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केके यांना मंगळवारी लाईव्ह कॉन्सर्टनंतर अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित केलं. आता एका गायिकेने देखील केके सारखा ‘मलाही स्टेजवर गातानाच मृत्यू यावा’ अशी अजब इच्छा व्यक्त केली आहे.

केके यांच्या मृत्यूनंतर देशभरातून लोक श्रद्धांजली वाहत आहेत. गायिका सोना मोहपात्रा हीने देखील आपल्या शब्दांमध्ये केके यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, एका वृत्तपत्राशी बोलताना ती म्हणाली, केके यांच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्काच बसला. केके आता आपल्यात नाहीत.

तसेच तिने यावेळी बोलताना तिची इच्छा देखील बोलून दाखवली. म्हणाली, मलाही स्टेजवर गातानाच मृत्यू यावा अशी माझी इच्छा आहे. ज्या कारणासाठी आपला जन्म झाला आहे तेच कार्य करताना मृत्यू येणे किती सौभाग्याचे ठरेल, असे गायिका सोना मोहपात्रा म्हणाली.

केके यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाली, माझ्या बँडसोबत प्रवास करताना मी अनेकदा त्यांना विमानतळांवर भेटले आहे. ज्येष्ठ संगीतकार म्हणून त्यांनी मला नेहमीच मार्गदर्शन केले आहे. संगीत प्रेमींसाठी हे मोठे नुकसान आहे. त्यांच्या शेवटच्या दिवसाचे गीत ऐकून कोलकाताला धन्यता वाटली असेल. मला खात्री आहे की ते स्वर्गात देखील गातच असतील.

सोना मोहपात्रा पुढे म्हणाली, केके एक उत्कृष्ट गायक होते. केके ग्लॅमरपासून लांब राहायचे. त्यांनी कधीही कोणत्याही स्पर्धेत स्वतःला कमी लेखले नाही, ते त्यांच्या नियमांवर आणि वचनांवर ठाम होते. त्यांनी खूप गाणी गायली. परंतु कधी पक्षपात केला नाही, किंवा कोणत्याही गटाचा भाग बनले नाहीत.

दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर केके यांचा फोटो शेअर करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. म्हणाले, तो माझा लहान भाऊ होता. आम्ही सोबतच मुंबईला आलो होतो. ‘माचिस’ या चित्रपटाच्या स्वरुपात आमचं पाहिलं काम आणि त्या कामासाठी यश सोबतच मिळालं होतं. खूप आठवणी, असंख्य एकत्र क्षण आठवून अत्यंत दुःख होत आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now