Share

Uddhav thackeray : ‘देशपातळीवर भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व करा’; प्रमुख विरोधी नेत्यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

आगामी निवडणूक २०२४ साठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपने देखील मोठी रणनीती आखली आहे. भाजपचा या आगामी निवडणुकीतील विजयी रथ रोखण्यासाठी सध्या देशभरात सर्वच विरोधकांची मोर्चेबांधणी सुरू आहे. सर्वच पक्षांनी भाजपविरोधात रणशिंग फुंकरले आहे.

२०२४ च्या निवडणुकीत भाजपला विजयापासून रोखण्यासाठी विरोधक जे मोर्चेबांधणी करत आहेत, या आघाडीत आता उद्धव गटाच्या शिवसेनेचा समावेश असावा असे आघाडीतील प्रमुख नेत्यांची इच्छा आहे. एवढेच नाही तर या आघाडीचे नेतृत्वही उद्धव ठाकरेंनी करावं अशी त्यांची इच्छा आहे.

देशात आधी २०१४ आणि नंतर २०१९मध्ये मोठ्या बहुमताने भाजप सत्तेवर आले. त्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये पक्षाच्या विजयाची घोडदौड सुरूच आहे. अशावेळी त्यांच्या विजयाचा रथ रोखण्यासाठी देशाच्या पातळीवर विरोधक एकत्र येऊ लागले आहेत.

प्रामुख्याने काँग्रेसच्या नेत्यांबरोबरच शरद पवार, ममता बॅनर्जी, नितीशकुमार आदी नेत्यांची फौज भाजपविरोधात आवाज देऊ लागली आहे. अशावेळी महाराष्ट्रात गेली २५ वर्षे सोबत असलेली उद्धव गटाची शिवसेना भाजपविरोधात लढायला उभी राहिल्याने विरोधकांनी या पक्षाकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे.

भाजपने उद्धव गटाच्या शिवेसेनेला भगदाड पाडत सत्तेवरून खाली खेचले आहे. सेनेमधील फुटीमध्ये पडद्याआडून सहभाग घेणाऱ्या भाजपने सध्या एवढ्या जुन्या मैत्रीचा विश्वासघात केल्याची भावना राज्यातील शिवसैनिकांमध्ये आहे. तसेच भाजप आणि शिवसेना हे दोन्ही हिंदुत्वावादी पक्ष आहेत.

त्यातच उद्धव हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे हिंदुत्वाचे प्रखर विचाराचे नेते म्हणून ते ओळखले जातात. २०२४ची निवडणूक जर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवण्याची ठरली तर उद्धव हे त्यासाठी चांगलाच पर्याय ठरू शकतात, असे विरोधकांना वाटते. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे यांना पुढे करण्याची योजना भाजपविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या विरोधकांकडून आखण्यात येत असल्याचे समजत आहे.

राज्य राजकारण

Join WhatsApp

Join Now