Share

काळवीट मारूनही सलमान खटल्यातून निर्दोष सुटला, पण आम्ही त्याला सोडणार नाही, त्याचा कार्यक्रम होणारच

salman khan
गायक सिद्धू मिसेवाला याची नुकतीच गोळ्याझाडून हत्या करण्यात आली. तर अलीकडेच अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते, ज्यामध्ये सलमानला सिद्धू मुसेवाला करुन टाकू असे म्हटले होते. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. त्याचबरोबर याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत.

सलीम खान यांना हे धमकीचं पत्र मिळाल्यानंतर त्यांनी लगेचच पोलिसांना याबद्दल माहिती दिली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव चर्चेत होते. तर आता या घटनेतील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

नुकत्याच घडलेल्या या दोन्ही घटनेत पोलिसांना लॉरेन्स बिश्नोईवर संशय आल्याने त्याची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. चौकशी दरम्यान त्याने सांगितलं की, ‘संपत मेहराला सलमान खानला मारण्यास सांगितले होते.’

दरम्यान, 2021 मध्ये एका एजन्सीने लॉरेन्स बिश्नोईची कसून चौकशी केली होती. त्यावेळी त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. लॉरेन्सने सलमानच्या हत्येचा कट रचल्याची कबुली त्याने दिली होती. सलमानची हत्या करण्यासाठी संपत मुंबईत आला होता.

मात्र संपतकडे पिस्तुल होती, त्यामुळे घराबाहेरून निषाणा साधन कठीण जात होतं. त्यानंतर संपतने अनिल पंड्या यांच्या मदतीने स्प्रिंग रायफल ३ ते ४ लाखांना नवीन खरेदी केली. मात्र पोलिसांनी या आरोपींचा तपास करत असताना दिनेशला अटक केली. त्यानंतर संपत नेहराला देखील बेड्या ठोकल्या.

दरम्यान, अलीकडेच लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने सलमान खान हे आपले पुढचे लक्ष्य असल्याचे सांगितले आहे. काळवीट मारल्याबद्दल सलमान खानने माफी मागितली तर तो वाचेल नाही, तर आम्ही त्याचा कार्यक्रम करुन टाकू, असे लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने म्हटले आहे.

एका मुलाखतीदरम्यान, जेव्हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ राजवीर सोपूला सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर त्याच्या पुढील लक्ष्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने थेट सलमान खानचे नाव घेतले. राजवीर सोपू म्हणाला, सलमान खानने काळवीट मारले असून आज तो सर्व खटल्यातून निर्दोष सुटला आहे. काळवीटाला मारून त्याने मोठी चूक केली आहे. भविष्यात आम्ही सलमानचा कार्यक्रम नक्की करु त्यात कोणताच बदल करणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर क्राईम ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now