आपल्या गाण्यांनी सर्वांना वेड लावणाऱ्या लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. 6 फेब्रुवारी रविवारी सकाळी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले. रविवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील शिवाजी पार्क येथे भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज आपण त्यांचा दिनक्रम कसा होता ते जाणून घेऊ.(Latadidi’s routine was strict discipline)
लता मंगेशकर यांनी 7 दशकं त्यांच्या करीयरसाठी झोकून दिली होती. हा 7 दशकांचा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता म्हणजेच हा जीवनप्रवास सुदृढ करण्यासाठी त्यांनी अनेक चांगल्या सवयी आपल्या अंगी जोपासल्या होत्या. त्यांनी गाण्याच्या शुटिंगसाठी अनेक देशांत प्रवास केला परंतु यामध्येही त्यांनी आपल्या चांगल्या सवयी सोडल्या नाही.
वृतानुसार वयाची 90 वर्ष पूर्ण केली तरी लतादीदी रोज सकाळी 6 वाजता उठायच्या. तब्येत चांगली राहावी यासाठी त्यांनी कोमट पाणी प्यायला सुरूवात केली होती. उठण्याच्या थोड्या वेळातच त्या नाश्ता करायच्या. दुपारच्या जेवणात आमटी, भाजी, पोळी असा साधा आहार त्या घ्यायच्याय तर रात्रीच्या जेवणात आमटी-भात खाणे त्यांना जास्त आवडायचे. त्या रात्री साडेनऊ वाजता जेवण करायच्या.
माहितीनुसार दीदींना खाण्याची खूप आवड होती. एका मुलाखतीत वहिदा रहमान सांगतात की, लता मंगेशकर यांना चॉकलेट्सची आवड होती, ती त्यांची कमजोरी होती. त्यांना गुलाबजाम, दहीवडे, फिश करी, रव्याचा शिरा, खिमा समोसा, जिलबी आणि चिकन खाणे आवडायचे. पण वय वाढल्यानंतर आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्वाचे असल्याने त्यांनी मसालेदार, आंबट आणि तेलकट पदार्थ खाणे कमी केले होते.
या वयातही दीदी रोज गाण्याचा रियाज करायच्या. त्यांना स्टेज परफॉर्मन्सचे अनेक प्रस्ताव यायचे, पण त्या यासाठी तयार नसायच्या. त्या संपूर्ण दिवसात सोफ्यावर बसणे आणि बेडरूममध्ये आराम करायच्या. खास लोकांशी त्या रोज फोनवर बोलून विविध गोष्टींवर चर्चा करायच्या. तसेच कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर ट्विट करायची त्यांना सवय होती.
महत्वाच्या बातम्या
मैने प्यार कियाच्या सेटवर सलमान लक्ष्मीकांत बेर्डे सोबत एक शब्दही बोलत नसायचा; खरे कारण आले समोर
‘आमच्या घरात नाक खुपसू नका’, हिजाब प्रकरणावरून ओवेसींनी पाकिस्तानला सुनावलं
महाराष्ट्रातील तरुण हिजाब प्रकरणावरुन भडकले; म्हणाले, विद्यार्थीनी मंगळसुत्र घालतात, कुंकू लावतात ते चालत का?
लतादीदींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा खुलासा, शेवटच्या क्षणातही आनंदी होत्या लता मंगेशकर