Share

‘लतादीदींमुळे माझी बिर्याणी फेमस झाली, माझं अख्खं कुटुंब त्यावर जगलं’; वाचा भावूक करणारा किस्सा..

महागायिका,भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानाने अवघ्या देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने अनेकांच्या आयुष्यात पोळकी निर्माण झाली आहे. लता दीदींच्या जाण्याने अनेकांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. अशीच एक कहाणी हॉटेलमधील आचारी म्हणून काम करणाऱ्या युसूफने सांगून लतादीदींच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

लतादीदी ह्या खाण्याच्या बाबतीत खूपच शौकीन होत्या. मात्र त्यांच्या जेवणातील एक खास मेनू म्हणजे साताऱ्यातील युसूफ बागवान अर्थात बिर्याणीवाले चाच्यांच्या हातची बिर्याणी होय. लतादीदी पश्चिम महाराष्ट्रात आल्या की त्यांचा ठरलेला नेहमीचा मेनू म्हणजे सातारची युसूफची ही बिर्याणी.

युसूफ भाई बागवान मूळचे सातारचे. मात्र गेल्या दोन वर्षापासून ते शेडगेवाडी येथील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत आहेत. युसूफ भाई आणि दीदी यांच्यात निर्माण झालेल्या नात्याबाबत बोलताना आणि त्यांच्या विषयीच्या आठवणी जागवताना युसूफ भाई म्हणाले, केटरिंग व्यवसायात दीदींमुळे माझं नाव होऊन माझं अख्खं कुटुंब जगलं आणि युसुफचा युसूफभाई झाला.

साताऱ्यात आमचा वडिलोपार्जित बेकरी व्यवसाय होता. त्यावेळी रेडिओ हेच मनोरंजनाचे साधन होते. त्यांची गाणी ऐकत- ऐकत त्यांच्याशी बोलण्याची इच्छा झाली. दीदींच्या पहिल्या ओळखीची आठवण सांगताना चाचा म्हणाले, साताऱ्यातील सिटी पोस्‍टातून दीदींच्‍या पेडररोडवरील घरी ट्रंक कॉल करायचो. मात्र, त्‍या भेटायच्‍या नाहीत.

सतत पाच वर्षे दीदींचे घर, ट्रंक कॉल आणि मी हे सत्र सुरू होते. एकेदिवशी असाच मी केलेला ट्रंक कॉल दीदींनी उचलला. तेव्‍हापासून सुरू झालेला दीदींशी संवाद अलीकडे दोन महिन्‍यांपर्यंत सुरू होता. 1978 मध्ये दीदीचा फोन आला. त्यांनी मला पुण्याला भेटायला येणार आहेस का? असे विचारले.

तेव्हा होकार देत मी पुण्याला गेलो. तिथे आमची भेट झाली. गेल्या दहा वर्षापासून फोनवर संवाद साधणाऱ्या दीदींना प्रत्यक्षात भेटून झालेला आनंद अविस्मरणीय होता. 2002 साली नोव्हेंबर महिन्यात कोल्हापुरहून पुण्याकडे परताना त्या माझ्या घरी जेवणास आल्या होत्या. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत त्यांनी जेवण केले. असे युसूफ सांगतात.

इतर

Join WhatsApp

Join Now