Share

शिंदे गटाला जबर झटका, ‘या’ आमदाराची आमदारकी धोक्यात, सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय

Eknath Shinde

राजकीय वातावरण तापलेलं असतानाच शिंदे गटाला धोका देणारी एक बातमी समोर येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे थेट एकनाथ शिंदे यांना जबर धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार लता सोनवणे यांना मोठा झटका बसला आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर 40 आमदारांनी समर्थन दिलं. आणि त्यानंतर राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं. मात्र अजूनही शिंदे यांच्या समोरील अडचणी काही केल्या थांबण्याच नाव घेत नाहीये. अशातच शिंदे शिंदे गटातील एका आमदाराची थेट आमदारकी धोक्यात आल्याची माहिती समोर येतं आहे.

अशातच जात प्रमाणपत्र प्रकरणी जात पडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला.  सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटात दाखल झालेल्या शिवसेनेच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे पद धोक्यात आले आहे. यामुळे आता लता सोनवणे यांच्या आमदारकीवरच टांगती तलवार आली आहे.

2019 साली चोपडा विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जमातीच्या आरक्षीत जागेवरून लता सोनवणे या विजयी झाल्या होत्या. लता सोनवणे शिवसेनेच्या तिकिटावर लताताई सोनवणे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी व अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी लता सोनवणे यांच्याविरोधात तक्रार दिली होती.

आमदार लता सोनवणे यांचे टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार नंदुरबार येथील जातपडताळणी समितीकडे केली होती. समितीने जातप्रमाणपत्र अवैध ठरविले होते. या निर्णयाच्या विरोधात लताताईंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथे त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती.

दरम्यान, लताबाई या मागील विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यापासूनच जात प्रमाणपत्राच्या वैधतेवरुन वादात सापडल्या आहेत. लताबाई आता अपात्र झाल्या असल्याने शिंदे गटाचे संख्याबळ एका आमदाराने कमी होणार असल्याचं बोललं जातं आहे. यामुळे आता लताताई सोनवणे यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now