Share

काश्मिर फाईल्स चित्रपटात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या होत्या लता मंगेशकर, दिले होते वचन

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स‘ या चित्रपटाने प्रेक्षकांना भावूक केले आहे. काश्मीरच्या नयनरम्य खोऱ्यातून तीन दशकांपूर्वी घर सोडून पळून गेलेल्या काश्मिरी पंडितांची कहाणी मांडून विवेकने खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटाने पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांच्या जखमा ताज्या केल्या आहेत.(lata-mangeshkar-who-played-a-pivotal-role-in-the-film-kashmir-files-had-promised)

चित्रपटाबाबत लोक दोन गटात विभागले गेले आहेत. एक गट याला अत्यावश्यक चित्रपट म्हणत आहे, तर दुसरा गट त्याला अनावश्यक म्हणत आहे. या चित्रपटाची जितकी चर्चा होत आहे, तितकीच तो बॉक्स ऑफिसवर कमाल करत आहे. दिवंगत गायिका लता मंगेशकर(Lata Mangeshkar) यांनीही विवेकच्या चित्रपटासाठी वचन दिले होते.

विवेक अग्निहोत्रीने खुलासा केला की, ‘त्यांनी दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्याशी त्यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटातील गाणे गाण्यासाठी संपर्क साधला होता. या चित्रपटात एकही गाणे नाही, हे एक दुःखद, महाकाव्य नाटक आहे पण नरसंहारातील पीडितांना श्रद्धांजली देखील आहे. खरंतर मी एका काश्मिरी गायकाचं लोकगीत रेकॉर्ड केलं होतं आणि ते गाणं लतादीदींनी गाावं अशी आमची इच्छा होती.’

विवेक पुढे म्हणाला, ‘लतादींनी चित्रपटांसाठी गाणे बंद केले होते आणि निवृत्ती घेतली होती, पण तरीही आम्ही त्यांना विनंती केली. त्या पल्लवी जोशीच्या खूप जवळच्या होत्या आणि त्या आमच्या चित्रपटात गाण्यास तयार झाल्या. काश्मीर हे लतादीदींच्या हृदयाच्या अगदी जवळ होते.

कोविडची परिस्थिती बरी होताच त्या चित्रपटासाठी गाणे रेकॉर्ड करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांना स्टुडिओत जाण्याची परवानगी नव्हती, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गाणे रेकॉर्ड करण्यासाठी थांबलो होतो पण त्या कायमच्या निघून गेल्या. त्यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले.

‘द काश्मीर फाईल्स'(‘The Kashmir Files) हा राजकीय प्रचार करणारा चित्रपट असल्याचे सांगत काही लोक विवेक अग्निहोत्री यांच्यावर एका विशिष्ट धर्माविरोधात वातावरण निर्माण केल्याचा आरोप करत आहेत. यावर चित्रपट निर्मात्याने स्पष्टीकरण देत सांगितले की, ‘काही लोक काश्मीरचा व्यवसाय म्हणून वापर करत आहेत, आमच्या चित्रपटाने तो उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे ज्या लोकांना त्याचा फायदा झाला ते वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण दहशतवादावर कोणताही वाद होऊ शकत नाही.’

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now