Share

भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, कलाविश्वावर शोककळा

Lata Mangeshkar Last Tweet

देशाच्या गाणकोकिळा लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. देशासह जगभरातील श्रोत्यांच्या जगण्याला अमृतसंजीवनी देत आलेला स्वर्गीय सूर हरपल्यानं आज संपूर्ण देश शोकाकूल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून लतादीदी (Lata Didi) यांना आजारी असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आज अखेर भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांच निधन झाले आहे. मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं.

तसेच उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं.

मात्र उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच हिंदी संगीतविश्वात त्यांना ‘लता दीदी’ म्हणून ओळखलं जातं.

दरम्यान, मुंबईतील पेडर रोड भागात असलेल्या लता मंगेशकर यांच्या प्रभुकुंज निवासस्थानी दुपारी 12.30 वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ट्विट करत आदरांजली वाहिली आहे. ‘जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील, असे पवारांनी म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
जामिनासाठी मागितली खंडणी; राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित महिला पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल
मी भारतासाठी ४२४ सामने खेळलोय हे लक्षात ठेवा; सौरभ गांगुली भडकला
‘या’ पठ्याने थेट गुगलमध्येच शोधली चूक, गुगलनेही चूक मान्य करत दिली ३.६६ कोटींची नोकरी
‘शिवसेनेनं सोमय्यांना ठार मारण्याचा प्लॅन आखला होता’, चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक आरोप

इतर मनोरंजन राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now