Share

लता मंगेशकर यांचे खरे नाव होते ‘हेमा’, वडिलांनी ‘या’ कारणामुळे बदलले होते नाव, रंजक आहे किस्सा

Lata Mangeshkar Original Name

स्वरकोकीळा लता मंगेशकर आज आपल्यात नाहीत पण त्यांचा आवाजाच्या रूपात त्या सदैव अमर राहतील. लता यांनी वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये ३० हजारपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. आपल्या जादूई आवाजाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात त्यांचे करोडो चाहते आहेत. लता मंगेशकर यांना ओळखत नाही असा कोणताच व्यक्ती नसेल. पण तुम्हाला माहित आहे का? त्यांचे खरे नाव लता नाही (Lata Mangeshkar Original Name )तर दुसरा एक वेगळाच नाव होता.

लता मंगेशकर यांच्या वडिलांनी नाटकातील पात्राच्या नावाने प्रभावित होऊन आपल्या मुलीचे नाव बदलून लता असे ठेवले होते. त्यामागची कथा फारच रंजक आहे. हा किस्सा फारशा लोकांना माहीत नसेल. चला तर मग या लेखाद्वारे जाणून घेऊया की, त्यांना लता मंगेशकर हे नाव कसे पडले.

लता मंगेशकर जन्मताच त्यांचे नाव हेमा ठेवण्यात आले होते. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर मराठी रंगभूमीचे प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्यसंगीतकार होते. एकदा ते ‘भावबंधन’ नाटकात काम करत होते. तर या नाटकातील एका स्त्री पात्राचे नाव लतिका असे होते. दीनानाथजींना हे नाव इतकं आवडलं की त्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यांनी आपल्या मुलीचं नाव बदलून लता असं ठेवलं. तेव्हापासून हेमा यांना संपूर्ण जग लता या नावाने ओळखते.

लता मंगेशकर यांच्या आडनावाबाबतही एक रंजक किस्सा आहे. असे सांगितले जाते की, लता मंगेशकर यांचे वडिल पंडित दीनानाथ मंगेशकर हे त्यांच्या वडिलांपेक्षा आईच्या खूप जवळ होते. दीनानाथ मंगेशकर यांच्या आईचे नाव येसूबाई असे होते. त्या गोव्यातील मंगेशी या गावात राहत होत्या. तिथे त्या मंदिरात भजन-कीर्तन करून उदरनिर्वाह करत असते. तेथूनच मंगेशकर हे नाव पंडित दीनानाथ यांच्या नावासोबत जोडलं गेलं.

महाराष्ट्रातील ठिकाणांच्या नावांसोबत आडनावे जोडलेली आहेत. गावाच्या नावाला ‘कर’ जोडल्याने तेथील रहिवाशाचे आडनाव होते. जसे क्रिकेटर सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर आदींच्या नावात दिसतात. त्याचप्रमाणे पंडित दीनानाथ यांच्या आईच्या गावाचे नाव मंगेशी होते. त्यानंतर या नावात कर जोडले गेले आणि त्यानुसार ते मंगेशकर असे झाले. लता यांना त्यांच्या वडिलांकडून मंगेशकर हे आडनाव मिळाले आणि त्यानंतर त्या लता मंगेशकर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

महत्त्वाच्या बातम्या :
लता मंगेशकर यांचा ‘हा’ ट्विट ठरला शेवटचा; ‘या’ खास व्यक्तीसाठी केली होती शेवटची पोस्ट
लता मंगेशकर यांचे निधन कोरोनामुळे नाही, तर ‘या’ कारणामुळे झाले; डॉक्टरांनी दिली धक्कादायक माहिती
कोरोनापासून जगाची सुटका व्हावी अशी होती लतादीदींची शेवटची इच्छा, पण त्याच कोरोनाने घेतला जीव

मनोरंजन बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now