Share

लता मंगेशकर यांचा ‘हा’ ट्विट ठरला शेवटचा; ‘या’ खास व्यक्तीसाठी केली होती शेवटची पोस्ट

Lata Mangeshkar Last Post

भारतरत्न लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने ८ जानेवारी रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्या रूग्णालयातच दाखल होत्या. तर आज रूग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील शिवाजी पार्क येथे आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान लता मंगेशकर यांनी केलेला शेवटचा ट्विट (Lata Mangeshkar Last Post) चर्चेत आहे.

लता मंगेशकर या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असत. याद्वारे त्या दररोजच्या घडामोडींसदर्भात काही ना काही पोस्ट करत असत. तर त्यांनी शेवटचा ट्विट अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्यासाठी केलं होतं. सिंधुताई सपकाळ यांचे नुकतंच निधन झालं आहे. तर त्यांना श्रद्धांजली वाहताना लता मंगेशकर यांनी एक ट्विट केलं होतं आणि हीच त्यांची शेवटची पोस्ट ठरली.

सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहत लता मंगेशकर यांनी लिहिले होते की, ‘वात्सल्यसिंधु, अनाथांच्या आई, थोर समाज सेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच मला अत्यंत दुःख झाले. त्यांच्या निधनाने समाजाची अपरीमित हानी झाली आहे. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन आम्ही त्यांचा गौरव केला होता. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति प्रदान करो’.

https://twitter.com/mangeshkarlata/status/1478425470983196683?s=20&t=-0gDsRRYh9s4Ert6VdIFuA

लता मंगेशकर यांनी रूग्णालयात दाखल होण्याच्या अवघ्या ४ दिवस आधी म्हणजेच ४ जानेवारी रोजी ही पोस्ट केली होती. तसेच ४ जानेवारी रोजीच त्यांनी पंचम दा यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली होती. त्यांनी लिहिले होते की, ‘आज आपल्या लाडक्या पंचमजी यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी तयार केलेले सर्व संगीत श्रवणीय होते आणि ते आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करते.’

https://twitter.com/mangeshkarlata/status/1478406498300702725?s=20&t=-0gDsRRYh9s4Ert6VdIFuA

या वर्षाच्या सुरुवातीलाही लता मंगेशकर यांनी एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांना समर्पित करणारा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत त्या सांगत आहेत की, ‘माझे आदरणीय वडील आम्हाला इतक्या मोठ्या जगात एकटे सोडून गेले. पण मला ते नेहमी माझ्यासोबत असल्याचे वाटते. अनेकवेळा मला असे वाटते की, ते माझ्या शेजारी बसून मला गाणं शिकवत आहेत. मला कधी कशाची भीती वाटत असेल तर ते माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणतायेत, घाबरू नकोस, मी आहे’.

‘असेच आमची ५० वर्षे उलटून गेली आहेत. जर ते माझ्यासोबत नसते तर विचार करा, माझ्यासारख्या एका छोट्या गायिकेला एवढी प्रसिद्धी आणि सन्मान मिळाला असता का? मला नाही वाटत. कारण आज मला जे काही मिळाले हे त्यांचेच आशीर्वाद आहे’.

https://twitter.com/mangeshkarlata/status/1477283690002534404?s=20&t=-0gDsRRYh9s4Ert6VdIFuA

नववर्षाच्या शुभेच्छा देताना लता मंगेशकर यांनी ट्विट करत लिहिले होते की, ‘नमस्कार, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. कोरोनाच्या या संकटातून संपूर्ण जगाची सुटका होवो. तुम्ही सर्वजण सुखी राहा, निरोगी राहा हीच माझी सदिच्छा’. लता मंगेशकर यांनी त्यांच्या ट्विटमधून कोरोनापासून सर्वांची सुटका होण्याची सदिच्छा व्यक्त केली होती. मात्र, याच कोरोनामुळे आज आपण या गान सरस्वतीला गमावलं आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देश आज शोकसागरात बुडाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
सोनाली कुलकर्णी ते भरत जाधवपर्यंत अनेक मराठी कलाकारांनी लतादीदींना वाहिली श्रद्धांजली; पहा कोण काय म्हणाले..
…म्हणून लता मंगेशकर यांनी आयुष्यभर लग्न केले नाही; जाणून घ्या खरे कारण..
कहाणी गाणकोकीळेची: या कारणामुळे नाही केले लग्न, ५० वेळा पाहिला होता एकच चित्रपट

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now