बॉलिवूडच्या दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्यावर मागील काही दिवसांपासून मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. लता मंगशेकर यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय, चाहत्यांसोबत सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटीही ते लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत. यादरम्यान आता लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आली (Lata Mangeshkar Health Update) आहे.
लता मंगेशकर यांना ८ जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्यांना निमोनियाचाही आजार झाला होता. लता मंगेशकर या ९२ वर्षांच्या असल्याने त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्या रूग्णालयात दाखल आहेत. तर जवळपास १९ दिवसानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
लता मंगेशकर यांच्या आरोग्याबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयातील डॉक्टर प्रतीत समदानी हे लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत आहेत. त्यांच्याशी मी बोललो आहे आणि त्यांनी सांगितले की, ‘लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत आता थोडी सुधारणा होत आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण आता व्हेटिंलेटर काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, अद्याप त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली आयसीयूमध्ये ठेवण्यात येणार’.
https://twitter.com/ANI/status/1487700839007412224?s=20&t=_CJTKOq2LicJ1KO_XLrnfQ
लता मंगेशकर यांना रूग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर येताच त्यांचे कुटुंबीय आणि चाहते निरंतर त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. यासोबत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही पोस्ट शेअर करत लता मंगेशकर यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
लता मंगेशकर या भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज गायिका आहेत. त्यांनी १९४२ साली वयाच्या १३ व्या वर्षी गायन क्षेत्रातील आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या दीर्घकालीन करिअरमध्ये वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये जवळपास ३० हजारपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. आपल्या मधुर गायनाद्वारे त्यांनी नेहमीच लोकांकडून प्रेम मिळवले आहे.
संगीत क्षेत्रातील गानसम्राज्ञी म्हणून लता मंगेशकर यांना ओळखले जाते. भारत सरकारने त्यांच्या कार्यासाठी भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच पद्म भूषण, पद्म विभूषण आणि दादा साहेब फाळके पुरस्कार देऊनही त्यांचे सन्मान करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
कोण होणार ‘बिग बॉस १५’ चा विजेता? आज रात्री ‘या’ पाच जणांमध्ये रंगणार फायनल
‘पुष्पा’ चित्रपटातील अभिनय पाहून अनुपम खेर यांनी अल्लू अर्जूनचे केले कौतुक; म्हणाले, तू रॉकस्टार आहेस
पॉवर स्टार पुनित राजकुमारसाठी साऊथ इंडस्ट्रीने उचलले मोठा पाऊल, त्याच्या शेवटच्या चित्रपटावेळी..