Share

रहें ना रहें हम, महका करेंगे: अनंतात विलीन झाल्या लता मंगेशकर, भावाने भरलेल्या डोळ्यांनी दिला मुखाग्नी

Lata Mangeshkar Funeral

दिग्गज गायिका लता मंगेशकर अनंतात विलीन झाल्या आहेत. आज रविवारी सकाळी मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यानंतर मुंबईच्या शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर शासकीय इसमामात अंत्यसंस्कार (Lata Mangeshkar Funeral) करण्यात आले. यावेळी लता मंगेशकर यांचे भाऊ ह्रदयनाथ मंगेशकर यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. हा क्षण संपूर्ण भारतवासीयांसाठी भावूक करणारा होता.

लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी राजकारण, मनोरंजन तसेच क्रिडा क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिवाजी पार्क येथे पोहोचून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबीयांसोबत, शरद पवार, शाहरूख खान, सचिन तेंडुलकर, पीयूष गोयल आदी मंडळींनीही शिवाजी पार्क येथे उपस्थित होते.

https://twitter.com/ANI/status/1490325372185223169?s=20&t=orUv_K-HGX3tyeFPdRKmNw

स्वरकोकिळेला शेवटच्या क्षणी पाहण्यासाठी शिवाजी पार्क येथे असंख्य जनसागर लोटला होता. लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दोन दिवस राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकारनेही दुखवटा म्हणून सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहिर केली आहे.

https://twitter.com/ANI/status/1490317353212874753?s=20&t=orUv_K-HGX3tyeFPdRKmNw

लता मंगेशकर यांच्या निधनावर राजकारण, क्रीडा तसेच मनोरंजन जगतातील अनेक मंडळींकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1490326361788993540?s=20&t=l_0hgqNRuIo1Z4Hem8KfCw

लता मंगेशकर यांनी भारतीय सिनेसृष्टीतील त्यांच्या दीर्घकालीन करिअरमध्ये वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये जवळपास ३० हजारपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. आपल्या मधुर गायनाद्वारे त्यांनी नेहमीच लोकांकडून प्रेम मिळवले आहे.

संगीत क्षेत्रातील गानसम्राज्ञी म्हणून लता मंगेशकर यांना ओळखले जाते. भारत सरकारने त्यांच्या कार्यासाठी भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच पद्म भूषण, पद्म विभूषण आणि दादा साहेब फाळके पुरस्कार देऊनही त्यांचे सन्मान करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
लता मंगेशकर यांचा ‘हा’ ट्विट ठरला शेवटचा; ‘या’ खास व्यक्तीसाठी केली होती शेवटची पोस्ट
सोनाली कुलकर्णी ते भरत जाधवपर्यंत अनेक मराठी कलाकारांनी लतादीदींना वाहिली श्रद्धांजली; पहा कोण काय म्हणाले..
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्राकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर, जाणून घ्या काय असतो राष्ट्रीय शोक?

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now