Share

लता मंगेशकरांना आई मानत असे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर; किस्सा वाचून डोळ्यात पाणी येईल

Lata Mangeshkar And Sachin Tendulkar

संगीत क्षेत्रातील गानसरस्वती लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या निधनावर मनोरंजनसृष्टीपासून ते राजकीय आणि क्रीडा क्षेत्रापर्यंत अनेक लोकांकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. लता मंगेशकर या सर्वांसाठी प्रिय होत्या. क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यात एक खास नाते होते. सचिनसाठी लता मंगेशकर या मातृतुल्य (Lata Mangeshkar And Sachin Tendulkar) होत्या.

सचिन तेंडुलकरने स्वतः अनेकवेळा या गोष्टीचा स्वीकार केला आहे की, लता मंगेशकर या त्याच्यासाठी आईसमान आहेत. एवढेच नाही तर सचिनला जेव्हा २०१४ साली भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन त्याचा सन्मान करण्यात आला होता. त्यापूर्वीच लता मंगेशकर यांनी सचिनला भारतरत्न देण्यासाठी अनेकवेळा शिफारस केली होती.

२०१० साली लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हटले होते की, ‘माझ्यासाठी सचिन तेंडुलकर हेच खरे भारतरत्न आहेत. त्यांनी देशासाठी जे केले ते फार कमी लोक करू शकतात. ते या सन्मानास पात्र आहेत. त्यांनी आपल्या सर्वांना अभिमान मिळवून दिला आहे’.

https://twitter.com/mangeshkarlata/status/437967688464207874?s=20&t=fYeCqv0qlq1cmLW-gDeQsg

सचिनसोबतच्या नात्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले होते की, ‘सचिन मला आईसमान मानतात आणि मी त्यांच्यासाठी नेहमी आईप्रमाणे प्रार्थना करते. त्यांनी जेव्हा मला पहिल्यांदा आई म्हटले तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही. मला अजिबात याची कल्पना नव्हती आणि ते माझ्यासाठी आश्चर्यकारक होते. पण त्यांच्यासारखा मुलगा मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते’.

लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यात आणखी एक खास नाते आहे. ते म्हणजे लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांची पुण्यतिथी आणि सचिनचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे २४ एप्रिलला आहे. याबाबत बोलताना लता मंगेशकरांनी म्हटले होते की, ‘२४ एप्रिलला सचिन यांचा वाढदिवस असतो आणि त्याच दिवशी माझे वडील दीनानाथ मंगेशकर यांची पुण्यतिथी असते’.

दरम्यान, २०१७ साली सचिन तेंडुलकरचा ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हाही लता मंगेशकर यांनी सोशल मीडियाद्वारे सचिनला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी ट्विट करत लिहिले होते की, ‘सचिनजी नमस्कार. तुमचा जो चित्रपट येत आहे त्यामध्येही तुम्ही क्रिकेटच्या मैदानासारखे चौकार आणि षटकार मारून धूमाकुळ घालणार, यासाठी शुभेच्छा’.

लता यांचे हे ट्विट रिट्विट करत सचिननेही त्यांचे आभार मानले होते. त्याने ट्विट करत लिहिले की, ‘आईच्या आशीर्वादाविना चौकार आणि षटकार कधीच होत नाहीत. तुम्ही माझ्यासाठी मातृतुल्य आहात. तुमच्या आशीर्वादासाठी खूप खूप धन्यवाद’.

महत्त्वाच्या बातम्या :
‘बाळासाहेबांनंतर लतादीदीच आमचा आधार, त्यांच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठा आघात झालाय’
लतादीदींच्या जाण्याने मोदींवर कोसळला दुःखाचा डोंगर; म्हणाले, माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत..
भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन, कलाविश्वावर शोककळा

खेळ बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now