राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी केलेलं हे विधान तंतोतंत खरं ठरवलं आहे. रोहित पाटील यांनी कवळेमहाकांळ नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विजयावर रोहित पाटील यांचे अभिनंदन करताना ‘शेवटी ते आबांचच रक्त’ असे गौरवउद्गार काढले आहेत.
“सांगलीतील कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत सगळे पक्ष एका बाजुला होते आणि रोहित पाटील एका बाजूला होते. कवठेमहांकाळमध्ये आर आर पाटील यांच्या विचारांची माणसे आहेत. रोहित विरुद्ध इतर पक्ष अशी निवडणूक त्या ठिकाणी होती. त्या ठिकाणी रोहितने विजय मिळवला. त्याबद्दल त्याचे अभिनंदन.” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पाटीलच्या विजयावर दिली आहे.
रोहित पाटिलची वक्तृत्व चांगले आहे. त्याची काम करण्याची पद्धत देखील वेगळी आहे. तो तळागाळातील लोकांशी मिसळतो. सर्वांबरोबर मिळून मिसळून राहण्याचा त्याचा स्वभाव आहे. त्याच्यावर कवठेमहांकाळमधील जनतेने विश्वास दाखवला आहे. यापुढे हा विश्वास कामामधून दाखवून देण्याची जबाबदारी रोहित पाटीलवर असणार आहे. आम्ही सगळे त्याला मदत करू, असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.
कवळेमहाकांळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने १० जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली आहे. या निवडणुकीत विरोधकांना फक्त ६ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत रोहित पाटील यांच्या विरोधात तासगाव- कवठेमहांकाळ तालुक्यातील सगळे बडे नेते एकवटले होते. पण या निवडणुकीत रोहित पाटील यांनी नेतृत्त्व करत विजय मिळला आहे.
निवडणुकीच्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना रोहित पाटील म्हणाले की, “निवडणुकीत विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं, माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.” कवठेमहाकांळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत रंगतदार लढत पाहायला मिळाली होती.”
आपला विजय हा लोकांमुळेच शक्य झाला असून या विजयाचं श्रेयदेखील रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ मधील जनतेला दिलं आहे. “कवठेमहांकाळमध्ये पाणी प्रश्नावर सगळ्यात आधी आम्ही काम करायला सुरुवात केली होती. आताही तेच काम पूर्ण करण्यासाठी झटणार आहोत”, अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
नारायण राणेंना शिवसेनेचा जोरदार धक्का! स्वत:च्या जिल्ह्यातील २ नगरपंचायती गमावल्या
पंकजा मुंडेच्या मार्गदर्शनाखाली ‘हा’ नेता ठरला किंगमेकर, तीन नगरपंचायतींवर भाजपचा झेंडा
पारनेरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीची काटे की टक्कर; जयश्री औटींचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी






