Share

कश्मीरमध्ये पकडलेला लष्करे तोयबाचा दहशतवादी निघाला भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख

काल सकाळी जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाच्या दोन दहशवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या दहशवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि एके-४७ बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. त्यातील तालिब हुसैन शाह हा दहशतवादी जम्मू काश्मीर विभागाचा भाजपचा आयटी सेल प्रमुख होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोणत्याही व्यक्तीची पार्श्वभूमी न तपासता सदस्यता दिल्यानं हा घोळ झाल्याचं पक्षानं स्पष्टीकरण भाजपनं आता दिलं आहे. तालिब हुसैन शाह याला ९ मे २०२२ रोजी भाजपने लेटरहेड जारी करत जम्मू काश्मीर विभागाचा भाजपचा आयटी सेल प्रमुख बनवलं होतं.

यावर भाजपचे प्रवक्ते आरएस पठानिया म्हणाले की, ऑनलाइन पद्धतीने सदस्यत्व दिल्याने हा प्रकार घडला. अशाप्रकारे सदस्यत्व देताना संबंधित सदस्याची पार्श्वभूमी तपासली जात नाही. त्याला थेट सदस्यत्व दिलं जातं. त्यामुळे भाजपात कुणीही प्रवेश करु शकतो.

तसेच म्हणाले, हे भाजपविरुद्धचे षडयंत्र आहे. अशाप्रकारे पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला मारण्याचा दहशतवादी कट रचतात. मात्र, कोणतीही मोठी घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली. ही दिलासादायक बाब आहे. सीमेवर अनेक लोक दहशत पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

जम्मू-काश्मिरमधील भाजपचे अध्यक्ष रवींद्र रैना यांच्यासोबत शाहचे छायाचित्र आहेत. रेसी जिल्ह्यातील तुस्कानच्या गावकऱ्यांनी या दहशतवाद्यांची माहिती पोलिसांना दिली होती, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी तालिब हुसैन शाह हा पाकिस्तानस्थित लष्कर-ए- तोयबाचा दहशतवादी कासिमच्या संपर्कात होता.

तसेच अलीकडच्या काळात राजौरी जिल्ह्यात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तीन घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. याशिवाय नागरिकांच्या हत्या आणि ग्रेनेड स्फोट घडवण्यात देखील त्याचा सहभाग असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. यामुळे एवढा मोठा दहशतवादी भाजपचा आयटी सेल असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

क्राईम

Join WhatsApp

Join Now