बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ता सध्या तिच्या आगामी वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. ‘कौन बनेगा शिखरवती’ असे या सीरीजचे नाव असून लवकरच ही सीरीज ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. यादरम्यान सीरीजच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत बोलताना लाराने सलमान खानबाबत एक मोठा खुलासा केला. लाराने सांगितले की, सलमान तिला मध्यरात्री फोन करत असतो.
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान लारासोबत रॅपिड फायर राऊंड हा खेळ खेळण्यात आला. यावेळी अनेक प्रश्नांची उत्तरे देताना लाराने सलमान खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, सोहा अली खान तसेच संजय दत्त यांच्यासंदर्भात मजेशीर उत्तरे दिली. मुलाखतीदरम्यान लाराला विचारण्यात आले की, तुझ्या सह-कलाकारांच्या अशा सवयींबद्दल सांग जे अनेक वर्षापासून बदलले नाहीत.
यावेळी सलमान खानबाबत बोलताना लाराने सांगितले की, ‘सलमान आजसुद्धा मला मध्यरात्री फोन करत असतो. कारण सलमान त्याचवेळी उठत असतो आणि मीसुद्धा त्याचवेळी त्याचे फोन कॉल्स रिसिव्ह करत असते’. लारा आणि सलमान यांच्यात चांगली मैत्री असून दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले. यामध्ये ‘पार्टनर’, ‘नो एंट्री’ या चित्रपटांचा समावेश आहे.
लाराच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास तिने ‘हंड्रेड’ या वेबसीरीजद्वारे डिजिटल माध्यमात पदार्पण केले होते. या सीरीजमध्ये तिच्यासोबत रिंकू राजगुरू मुख्य भूमिकेत होती. याशिवाय लारा ‘हिक अप्स अँड हूक अप्स’ या सीरीजमध्येही दिसली होती. यामध्ये तिच्यासोबत प्रतीक बब्बर आणि शिनोवासुद्धा होते.
लाराच्या चित्रपटांबाबत बोलायचे झाल्यास ती ‘बेल बॉटम’ या चित्रपटात शेवटची दिसली होती. या चित्रपटात ती इंदिरा गांधीच्या भूमिकेत दिसली होती. तर चित्रपटातील तिच्या लूकला प्रेक्षकांकडून खूप पसंती देण्यात आली होती. त्यानंतर लारा आता ‘कौन बनेगा शिखरवती’ या सीरीजमध्ये दिसणार आहे.
‘कौन बनेगा शिखरवती’मध्ये लारासोबत सोहा अली खान, कृतिका कामरा आणि अनन्या सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर यामध्ये एका राजाच्या (नसरूद्दीन शाह) चार मुलींधील एका मुलीची भूमिका लाराने साकारली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
कुणी कल्पनाही केली नसेल अशा ठिकाणी झाली होती धनुष आणि रजनीकांतच्या मुलीची पहिली भेट; वाचा कसे पडले एकमेकाच्या प्रेमात
‘पावनखिंड’चा थरार पाहायला व्हा तयार; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
रिअॅलिटी शोमध्ये मुलांनी उडवली मोदींची खिल्ली; सरकारने मीडिया हाऊसविरोधात उचलले टोकाचे पाऊल