ई कॉमर्स साइट Flipkart वर सध्या Big Saving Days Sale सुरु झाला आहे. या सेलची मुदत २२ जानेवारीपर्यंत असणार आहे. फ्लिपकार्टच्या या सेलसाठी टीव्ही, स्मार्टफोन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मोठी सवलत देण्यात आली आहे. Big Saving Days Sale मध्ये लॅपटॉपच्या सर्व श्रेणींवर उत्तम ऑफर देण्यात आल्या आहेत.
तुम्हाला जर नवीन लॅपटॉप घ्यायचा असेल, तर हा सेल तुम्हाला मोठा फायदेशीर ठरणार आहे. या सेलमुळे ग्राहकांची मोठी बचत होणार आहे. RedmiBook १५ हा लॅपटॉप तुम्हाला एक चांगला पर्याय ठरू शकतो. Big Saving Days Sale या सेलसाठी लॅपटॉपची किंमत ३९,९९० रुपये असणार आहे. RedmiBook १५ मध्ये १५.६ इंचाचा डिस्प्ले आहे. या लॅपटॉपमध्ये चांगली स्टोरेज सिस्टिम आहे.
या लॅपटॉपमध्ये ८ GB DDR4 रॅम आणि २५६ GB SSD स्टोरेज आहे. हा लॅपटॉप इंटेल i3 च्या ११ व्या जनरेशनवर काम करतो. या लॅपटॉपमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस सूट प्री-इंस्टॉल आहे. MSI GF63 या लॅपटॉपची किंमत ५५,९९० रुपये आहे. परंतु Big Saving Days Sale दरम्यान हा लॅपटॉप सवलतीत खरेदी करता येईल.
MSI GF63 या लॅपटॉपमध्ये १५.६ इंचाचा डिस्प्ले आहे. MSI GF63 या लॅपटॉपमध्ये ८ GB DDR4 रॅम आणि २५६ GB SSD आणि 1TB HDD स्टोरेज आहे. या लॅपटॉपमध्ये १० h Get Intel i5 Hexa Core हा प्रोसेसर आहे. या लॅपटॉपमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस सूट प्री-इंस्टॉल आहे. ग्राहकांसाठी या लॅपटॉपवर आकर्षक ऑफर देण्यात आल्या आहेत.
Big Saving Days Sale च्या दरम्यान एचपी कंपनीचा HP Pavilion Gaming Ryzen 7 हा लॅपटॉप ७५,५५० रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. HP Pavilion Gaming Ryzen 7 या लॅपटॉपमध्ये १५.६ इंचाचा डिस्प्ले आहे. या लॅपटॉपमध्ये १६ GB DDR4 रॅम आणि १ TB हार्ड ड्राइव्ह स्टोरेज आहे. या लॅपटॉपमध्ये AMD Ryzen 7 octa-core प्रोसेसर आहे. या लॅपटॉपमध्ये देखील मायक्रोसॉफ्ट ऑफिस प्री-इंस्टॉल आहे.
या सेलसाठी डेल व्होस्ट्रो या लॅपटॉपवर आकर्षक सवलती देण्यात आली आहेत. या सवलतीनुसार डेल व्होस्ट्रो या लॅपटॉपची किंमत ३९,४७२ रुपये आहे. या लॅपटॉपमध्ये १४ इंचाचा डिस्प्ले आहे. या लॅपटॉपला चांगली स्टोरेज सिस्टिम आहे. डेल वोस्ट्रो या लॅपटॉपमध्ये ८ GB रॅम आणि १ TB हार्ड ड्राइव्ह स्टोरेज आहे. या लॅपटॉपमध्ये इंटेल i3 हा प्रोसेसर आहे. हा लॅपटॉप मायक्रोसॉफ्ट ऑफिस प्री-इंस्टॉल केलेला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
कांद्यामुळे बांधला बंगला, मग बंगल्यावर कांद्याचा पुतळाच उभारला; शेतकऱ्याची राज्यात चर्चा
माझ्यासोबत सेक्स करा आणि मार्क्स मिळवा, प्राध्यापकाची खुली ऑफर ; पोलीसांनी ठोकल्या बेड्या
माझ्यासोबत सेक्स करा आणि मार्क्स मिळवा, प्राध्यापकाची खुली ऑफर ; पोलीसांनी ठोकल्या बेड्या