आज चारा घोटाळ्यातील डोरंडा कोषागार प्रकरणी दाखल खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. चारा घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या लालू प्रसाद यादव (lalu prasad yadav) यांना विशेष सीबीआय कोर्टानं २६ वर्षांनंतर निकाल देत दोषी मानलं आहे. हे प्रकरण डोरंडा कोषागारातून अवैधरित्या 139 कोटी रुपये काढण्याशी संबंधित आहे. अद्याप शिक्षेची घोषणा झालेली नाही.
तसेच या प्रकरणातील 24 जणांना न्यायालयाने दिलासा देत त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी 21 फेब्रुवारी रोजी लालू यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. 1996 सालापासून सुरू असलेल्या या खटल्याचा तब्बल 26 वर्षानंतर निकाल लागला आहे.
दरम्यान, अद्याप या घोटाळ्याप्रकरणी दोषी असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्यावरील शिक्षेची सुनावणी झाली नसून, त्यांना नेमकी काय शिक्षा सुनावली जाते, हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. जर लालू प्रसाद यादव यांनी तीन वर्षांची शिक्षा झाली, तर त्यांना जामीन मिळू शकतो, असंही सांगितलं जातं.
मात्र त्यापेक्षा जास्त शिक्षा झाल्यास लालू प्रसाद यादव यांना पुन्हा एकदा ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे. दुमका कोषागार प्रकरणात लालू यांना शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर ते १९ मार्च २०१८ पासून कारागृहात शिक्षा भोगत होते. गेल्या १७ एप्रिल रोजी त्यांना झारखंड हायकोर्टाने जामीन दिला होता. त्यानंतर प्रत्यक्षात ३० एप्रिल रोजी त्यांची कारागृहातून सुटका झाली होती.
दरम्यान, चला जाणून घेऊ या नक्की हे प्रकरण काय? चारा घोटाळा पहिल्यांदा 1996 साली समोर आला. यामध्ये बिहारच्या पशुपालन विभागात करोडो रुपयांचा घोटाळ्याचा खुलासा झाला. 1990 ते 1997 दरम्यान लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुसंवर्धन खात्याने बिहारच्या विविध जिल्ह्यात कोषागारातून कोट्यवधी रुपये अवैधरीत्या काढल्याचं आरोप आहे.
चारा घोटाळ्यात 3 वेगवेगळी प्रकरण असून तिन्हीही प्रकरणात लालू प्रसाद यादल आरोपी आहेत. सीबीआयने तपासात लालू प्रसाद यांना आधीच दोषी ठरवलं आहे. कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर 2013मध्ये लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. लालू प्रसाद यादव यांचं लोकसभेचं सदस्यत्व काढून घेतलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
बॉलिवूडच्या भाईजानने लता दीदींच्या आठवणींना दिला उजाळा, गाणं म्हणत व्हिडिओ केला पोस्ट
तुला ट्रोलर्सची भिती वाटत नाही का? प्रश्नावर उर्फी जावेदने दिले जबरदस्त उत्तर, म्हणाली..
8 जागांवर भाजप, 7 जागांवर शिवसेना विजयी, नगराध्यक्षपद मात्र १ जागा जिंकलेल्या काँग्रेसकडे; पहा कुठे झाली ही कमाल
मी तर तुझ्या परिसरात आहे! मुस्लिम व्यक्तीच्या स्वप्नात आले श्रीकृष्ण भगवान, ४० लाख खर्च करून उभारले मंदिर