Share

Aamir Khan: लालसिंग चड्ढाने वीकेंडला पकडला वेग, तरीही ५० कोटींपासून फारच लांब, वाचा आतापर्यंतची कमाई

Aamir Khan

Lal Singh Chadha, Aamir Khan, Kareena Kapoor/ आमिर खान आणि करीना कपूरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अनेक प्रकारच्या वाद-विवादात सापडला होता. अशातच आता हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन निराशाजनक आहे. बॉयकॉट ट्रेंडचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर स्पष्टपणे दिसून आला.

वीकेंडला चित्रपटाची कमाई थोडी वाढली आहे, ज्यामुळे कलाकारांमध्ये आणि निर्मात्यांमध्ये नवीन आशा निर्माण झाल्या आहेत. लाल सिंग चड्ढा यांच्या वीकेंड कलेक्शनमध्ये थोडी उडी होती.  रिपोर्ट्सनुसार, रविवारी (14 ऑगस्ट) चित्रपटाने 10 कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाच्या कमाईत आदल्या दिवसाच्या तुलनेत वाढ झाली आहे.

मात्र, आमिरच्या चित्रपटातून ज्या प्रकारची कमाई अपेक्षित होती त्यापेक्षा कमी आहे, पण तरीही चित्रपटाच्या व्यवसायात झालेली वाढ ही दिलासा देणारी बाब आहे. चित्रपटाच्या आत्तापर्यंतच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर लाल सिंह चड्ढाने 4 दिवसांत 37 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट हळूहळू वेग पकडत आहे आणि प्रगती करत आहे.

चार दिवसांत चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडला नाही हे निराशाजनक आहे. या वेगाने चित्रपटाने कमाई केली तर येत्या दोन दिवसांत ‘लाल लाल सिंग चड्ढा’ 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. लाल सिंग चड्ढाने पहिल्या दिवशी 11.50 कोटींचे कलेक्शन केले होते. चित्रपटाचा दुसऱ्या दिवशीचा व्यवसाय सर्वात कमजोर राहिला.

रिलीजच्या दुसऱ्या दिवशी आमिरच्या चित्रपटाने केवळ 6.50 ते 7 कोटींची कमाई केली होती. हे कलेक्शन पाहून चाहत्यांच्या अपेक्षाही भंगल्या, पण वीकेंडचा चित्रपटाला फायदा झाला. शनिवारी या चित्रपटाने 20 टक्क्यांच्या वाढीसह 8.50 कोटींचे कलेक्शन केले होते. त्याचवेळी, रविवारी या चित्रपटाने 10 कोटींची कमाई केली.

लाल सिंग चड्ढा हा हॉलिवूडचा क्लासिक चित्रपट फॉरेस्ट गंपचा रिमेक आहे. हा चित्रपट आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर मुख्य भूमिकेत आहे. मोना सिंग आमिर खानची आई झाली आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचे ​​खूप कौतुक होत आहे. आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाची अक्षय कुमारच्या रक्षाबंधनशी टक्कर आहे. आता 15 ऑगस्टचा चित्रपटाच्या बिझनेसला किती फायदा होतो ते बघूया.

महत्वाच्या बातम्या-
Boycott: लाल सिंग चड्ढानंतर रक्षाबंधनवर बहिष्कार टाकण्याचे होतेय मागणी, या कारणामुळे हिंदू एकवटले
लाल सिंग चड्ढा रिलीजपुर्वीच वादाच्या भोवऱ्यात, हिंदू संघटनेने पोस्टर जाळत दिली ही धमकी
अखेर प्रतिक्षा संपली! या तारखेला रिलीज होणार आमिर खानचा बहुचर्चित चित्रपट लाल सिंग चड्ढा
या पाच कारणांमुळे आमिर खानचा लाल सिंग चड्डा KGF 2 चा रेकॉर्ड मोडणार? जाणून घ्या 

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now