Share

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट पाहून लालकृष्ण अडवाणी रडले? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य

The Kashmir Files

अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेला ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटात १९९० च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार दाखवण्यात आला आहे. तर चित्रपट पाहून अनेकजण दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे कौतुक करत आहेत. तसेच सोशल मीडियावरही #TheKashmirFiles नावाचा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे. यासोबतच चित्रपटांसंबिधत अनेक संदेश, फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

असाच एक व्हिडिओ सध्या माध्यमात चर्चेत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट पाहून लालकृष्ण अडवाणी यांना अश्रू अनावर झाल्याचा दावा या व्हिडिओत करण्यात येत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत दिसत आहे की, लालकृष्ण अडवाणी एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये सहभागी झाले आहेत. एका यूजरने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘लालकृष्ण अडवाणी या वयातही ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात पोहोचले. यावेळी चित्रपट पाहून त्यांना अश्रू अनावर झाले आणि ते रडले. विचारा करा ती घटना किती भयंकर असेल जे काश्मिरी हिंदुंनी सहन केले’.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत लालकृष्ण अडवाणी भावूक झाल्याचे तर पाहायला मिळत आहे. पण ते ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट पाहून नाही तर दुसरा चित्रपट पाहून भावूक झाले आहेत. लालकृष्ण अडवाणी ‘शिकारा’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी पोहोचले होते. त्यावेळचा त्यांचा हा व्हिडिओ आहे.

या व्हिडिओत अडवाणी यांच्यासोबत विधू विनोद चोप्रासुद्धा दिसत आहेत. विधू विनोद चोप्रा यांनीच ‘शिकारा या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ७ एप्रिल २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु, तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. तर आता हा जुना व्हिडिओ ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटासोबत जोडण्यात येत आहे.

दरम्यान, ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाची प्रदर्शनापासूनच बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरु आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने ३.५५ कोटी, दुसऱ्या दिवशी शनिवारी ८.५० कोटी तर रविवारी १०.५० कोटी असे एकूण चित्रपटाने तीन दिवसात २२.५० एवढी कमाई केली आहे. तर येत्या दिवसात चित्रपट अधिक चांगली कमाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
VIDEO: ‘तु विद्या बालनसारखी दिसतेस’, अक्षय कुमारने श्रेया बुगडेला दिले खास गिफ्ट, श्रेयाही झाली अवाक
VIDEO: माझं प्रेम आहे अरुंधतीवर पण ती.., आशुतोषने इशाला सांगितले सर्व सत्य, अनिरुद्धचा जळफळाट
हास्यजत्रेच्या मंचावर येणार शेवंता, अपूर्वा नेमळेकर पहिल्यांदाचं कॉमेडी करताना दिसणार

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now