लोणावळा (Lonavala): लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1954 रोजी मुंबई येथे झाला. त्यांना पाच मोठे भावंडे होती. गिरगाव येथे सादर झालेल्या गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असल्यामुळे त्यांना अभिनयात आवड निर्माण झाली. त्यांनी शाळेतील आणि महाविद्यालयातील नाटक स्पर्धांमध्ये भाग घेतले व त्यांना पुरस्कारही मिळाले.
यानंतर सर्वांचा आवडता लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मुंबई मराठी साहित्य संघात काम करण्यास सुरुवात केली. लक्ष्याचे मूत्रपिंडाच्या आजारामुळे 16 डिसेंबर 2004 रोजी मुंबईत निधन झाले. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षांत, लक्ष्मीकांत यांनी त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे यांच्या नावावर ‘अभिनय आर्ट्स’ हे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस चालवले. बेर्डे एक गिटार वादक होते.
लक्ष्मीकांत बेर्डे यांना जाऊन 18 वर्ष पूर्ण झाली, तरी आजही त्यांच्या अभिनयाचे ठसे चाहत्यांच्या मनात उमटून आहे. लक्ष्मीकांत यांचे चित्रपट अजूनही वेगवेगळ्या चॅनलवर दाखवतात. महत्वाचं हेच की अजूनही लोक ते तितक्याच आवडीने बघतात. महेश कोठारे, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या तिघांची जोडी प्रेक्षकांच्या खूपच आवडीची आहे.
अजूनही यांचे चित्रपट आवडीने व आनंदाने बघितले जातात. त्यांनी बरेचसे जबरदस्त कॉमेडी चित्रपट केले. यात ‘एकापेक्षा एक’ ‘चिकट नवरा’ ‘रंग प्रेमाचा’, ‘लपवा छपवी’ ‘इजा, बिजा, तिजा’ आणि ‘बजरंगाची कमाल’ या सिनेमांचा समावेश आहे. ‘धूमधडाका’ या चित्रपटातून मराठी चित्रपट विश्वात पाऊल ठेवलेल्या लक्ष्याने मराठी सिनेसृष्टी गाजवली.
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही आपली प्रतिमा तयार करून ठेवली आहे. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटापासून त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. हिंदी विनोदी कलाकरांपेक्षाही लक्ष्याने कितीतरी अफलातून भूमिका पार पाडल्या. लक्ष्मीकांत बेर्डे यांना मूत्रपिंडाचा आजार झाला होता. त्यामुळे शेवटच्या दिवसांमध्ये ते अतिशय एकटे पडले होते.
‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट आताही सर्वजण आवडीने पाहतात. लक्ष्मीकांत, महेश आणि अशोक सराफ यांचे अनेक चित्रपट हिट झाले व आताही लोकांना तेच आवडतात. शेवटच्या दिवसांत ते लोणावळा येथील त्यांच्या बंगल्यामध्ये राहायला होते. त्यांनी कोणाला भेटणे बोलणे बंद केले होते. अशी माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर त्यांनी 2004 मध्ये अखेरचा श्वास घेतला.
लक्ष्मीकांत यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचे नाव अभिनय तर मुलीचे नाव स्वानंदी आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले तेव्हा अभिनय सात वर्षांचा तर स्वानंदी फक्त चार वर्षांची होती.आता ते दोघेही चित्रपटसृष्टीत काम करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
ग्राहकाने मुस्लिम डिलिव्हरी बॉयकडून जेवण घेण्यास दिला स्पष्ट नकार; अन् केलं असं काही केली वाचून तुम्हाला येईल चीड
“हे योग्य आहे का ? ३५ वर्षे काम केलेल्या निष्ठावंतांना ३२ वर्षांच्या आदित्य ठाकरेंचं ऐकावं लागत होतं”
उद्धव ठाकरेंचे संकटमोचक मिलिंद नार्वेकर शिंदे गटाच्या वाटेवर? थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट, राजकीय वर्तुळात खळबळ
Ranbir Kapoor: तब्बल १३ वर्षांनी रिलीज होतोय १८०० कोटींचा बिग बजेट चित्रपट; अक्षय, रणबीर, सैफ यांना बसणार धक्का