Share

दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधणारे आई आणि वडील; ‘लागिरं झालं जी’ फेम संतोष पाटील यांची पोस्ट चर्चेत

Lagira Zala Ji

झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ (Lagira Zala Ji) ही मालिका चांगलीच गाजली होती. मालिकेतील अज्या आणि शीतलीच्या जोडीला प्रेक्षकांची खूप चांगली पसंती मिळाली होती. तसेच मालिकेतील प्रत्येक कलाकाराने त्यांच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. ही मालिका आता संपली असली तरी अद्यापही या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात.

‘लागिरं झालं जी’ या मालिकेत समाधान मामाची भूमिका अभिनेते संतोष पाटील यांनी साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांना फार लोकप्रियता मिळाली. या मालिकेनंतर त्यांनी ‘साता जन्माच्या गाठी’, ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘मुलगी झाली हो’ अशा मालिकेत काम करताना दिसून आले. सध्या मनोरंजनसृष्टीत त्यांची यशस्वी वाटचाल सुरु आहे.

यादरम्यान नुकतीच समाधान मामा अर्थात संतोष पाटील यांनी एक नवी कार खरेदी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती देत या गाडी घेतल्याचा त्यांच्यापेक्षा त्यांच्या वडिलांना जास्त आनंद झाल्याचे म्हटले आहे. संतोष यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर त्यांच्या आई-वडिलांचा नव्या कारसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोंसोबत त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ‘बापा, आपण घेतलेली गाडी तुम्हाला आवडली. तुम्हाला खूप कौतुक वाटलं. आनंदाने सुनबाईला ड्रायव्हिंग क्लासला जा आणि गाडी चालवायला शिक, अस म्हणालात. स्वतःच्या नातीला सारखं गाडीचं नाव विचारत तिची गम्मत करत राहिलात’.

https://www.instagram.com/p/Cc66hJ7P6kR/

‘गाडी आणायच्या दिवशी भांबावल्यासारखे वाट बघत होतात. गाडीची पूजा केलीत. पेढे वाटले. मी विचारलं, ‘बापा, तुम्हाला काय हवं?’ तर छोटी अपेक्षा मला गाडीसोबत एकट्याला फोटो काढायचा आहे. एवढी छोटी आणि माफक अपेक्षा खर तर मीच हे ओळखायला हवं होतं’.

https://www.instagram.com/p/CbT1h7UgcD5/

‘दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधणारे आई आणि वडील. तुम्ही ईश्वरी संकेत आहात. तुम्हाला किती माफक अपेक्षा असतात आपल्या अपत्यांकडून. एक फोटो…बस इतकंच… अशावेळी वाटतं, नुसताच गाडी घेण्याचं नाही तर सतत सावलीसारखं वागवणाऱ्या मोबाईलचसुद्दा सार्थक झालं’.

‘कुटुंबाच्या आनंदातच आपला आनंद शोधणारे मायबाप प्रत्येक उंबरठ्यावर दिसतात. फक्त ते डोळे, त्याच उंबऱ्याच्या आत असताना आपल्या डोळ्यांना दिसायला पाहिजेत’. संतोष पाटील यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. अनेकजण त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांना शुभेच्छा देत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
धक्कादायक! प्रियांका चोप्राचा पती निक जोनसला झालाय ‘हा’ गंभीर आजार, डॉक्टर म्हणाले, मृत्यूही होऊ शकतो
साऊथ स्टार्सवर जळतात हिंदी स्टार्स, निर्माते राम गोपाल वर्मा ‘त्या’ प्रकरणावर स्पष्टच बोलले
‘हृदयात गोडसे अन् ओठावर गांधी असणाऱ्या नेत्यांना…’ मेवाणीच्या अटकेनंतर प्रकाश राज भडकले

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now