झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील एका अभिनेत्याचे नुकतीच अपघाती निधन झाले होते. डॉ. ज्ञानेश माने असे त्या कलाकाराचे नाव असून त्यांनी मालिकेत एका फौजीची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. यादरम्यान ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील कलाकारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे लोकांना आवाहन केले आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.
डॉ. ज्ञानेश माने यांचे १४ जानेवारी रोजी निधन झाले होते. त्यांच्या निधनाची बातमी देताना काही माध्यमात ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील कलाकारांचेही फोटो जोडण्यात येत होते. त्यामुळे अनेकांनी बातमी न वाचताच मालिकेतील अज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाणचे निधन झाल्याचे समजून घेतले. तसेच सोशल मीडियावर नीतीश चव्हाणचे फोटो व्हायरल होताना दिसून आले.
मात्र, नितीश चव्हाणला काहीही झालं नसून तो अगदी ठणठणीत असल्याचे मालिकेतील काही कलाकारांनी सांगितले. ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील अज्या म्हणजेच नितीश चव्हाण, समाधान मामा म्हणजेच संतोष पाटील आणि शितलीच्या वडिलांची भूमिका साकारणारे नाना म्हणजेच अभिनेते देवेंद्र देव हे सर्वजण चांदवडी गावातील एका मंदिरात एकत्र जमले होते.
चांदवडी या गावातच ‘लागिरं झालं जी’ मालिकेचं चित्रीकरण झालं होतं. तेथून या सर्वांनी एक व्हिडिओ काढून चाहत्यांना अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन केले आहे. संतोष पाटील यांनी हा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे.
यावेळी अज्या म्हणजेच नितीश चव्हाणने त्याला काहीही झाले नसून तो सुखरूप असल्याचे सांगितले. तसेच अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही यावेळी सर्व कलाकारांच्यातर्फे प्रेक्षकांना करण्यात आले.
https://www.instagram.com/p/CY6WgXwgKhX/
दरम्यान, ज्ञानेश माने रोटी घाटातून प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातानंतर ते बेशुद्धावस्थेत होते. त्यानंतर त्यांना पुण्याच्या ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच १४ जानेवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, भावजया आणि पुतणे असा परिवार आहे.
मूळचे बारामतीचे असणारे ज्ञानेश माने हे पेशाने डॉक्टर होते. डॉक्टर म्हणून सेवा बजावत असतानाच त्यांनी त्यांच्या अभिनयाचीही छंद जोपासली. आतापर्यंत ज्ञानेश यांनी ‘सोलापूर गँगवार’, ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’, ‘यदया’, ‘पळशीची पी टी’, ‘आंबूज’, ‘हंबरडा’, ‘भक्तांचा पाठीराखा’ अशा अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
‘ह्या खऱ्या जिजाऊच्या लेकी’; किरण मानेंची बाजू घेणाऱ्या महीला कलाकारांचे आव्हाडांनी केले कौतूक
किरण माने, सतीश राजवाडेंच्या भेटीत नेमकं काय घडलं? जितेंद्र आव्हाडांनी सांगीतले…
जावेद अख्तर यांचे दोन्ही बायकांसोबत फॅमिली फोटोशूट; फोटो पाहून लोकं म्हणाली..