मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील एका अभिनेत्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. डॉ. ज्ञानेश माने असे या अभिनेत्याचे नाव असून ‘लागिरं झालं जी’ मालिकेत ते एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.
ज्ञानेश माने हे रोटी घाटातून प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातानंतर ते बेशुद्धावस्थेत होते. त्यानंतर त्यांना पुण्याच्या ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच १४ जानेवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, भावजया आणि पुतणे असा परिवार आहे.
मूळचे बारामतीचे असणारे ज्ञानेश माने हे पेशाने डॉक्टर होते. डॉक्टर म्हणून सेवा बजावत असतानाच त्यांनी त्यांच्या अभिनयाचीही छंद जोपासली. दोन्ही क्षेत्रात तारेवरची कसरत करत त्यांनी कलाक्षेत्रात आपली ओळख निर्माण केली.
आतापर्यंत ज्ञानेश यांनी ‘सोलापूर गँगवार’, ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’, ‘यदया’, ‘पळशीची पी टी’, ‘आंबूज, हंबरडा’, ‘भक्तांचा पाठीराखा’ अशा अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहेत.
ज्ञानेश यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनावर अनेकजण शोक व्यक्त करत आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारे अनेकजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
आई म्हणाली, मी प्रेमात आहे, मुलांनी थाटामाटात लावून दिले तिचे दुसरे लग्न; मुंबईच्या मुलांचे देशभरात होतंय कौतूक
किरण माने यांनी भाजपवर केले गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
वडिलांच्या उपचारासाठी तीन बहिणींची मैदानावर धावाधाव; बक्षिसांच्या रकमेतून औषधोपचार