पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांना राज्यभरात ओळखळे जाते. ते वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. आता पुन्हा एकचा ते चर्चेत आले आहे. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची बदली झाल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरु आहे. (kushna prakash transfer)
तसेच आता कृष्ण प्रकाश यांच्या जागी पिंपरी-चिंचवडमध्ये मुंबई पोलिस दलातील विश्वास नांगरे पाटील यांची पोलिस आयुक्तपदी निवड होण्याची चर्चा आहे. त्यामुळे इथले पोलिस कर्मचारी आणि अधिकारीही आनंदात असल्याचे समजत आहे. पण असे असतानाच आता हा सर्वप्रकार फूल बनवण्याचा असल्याचे समोर आले आहे.
एप्रिल फूलमुळे या चर्चाला उधाण आले होते. त्यामुळे कृष्णप्रकाश यांच्या बदलीने खुश असणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. शुक्रवारी एप्रिल महिन्याचा पहिला दिवस होता. असे असतानाच पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची तडकाफडकी बदली झाल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत होते.
तसेच मेसेज करणारे, व्हायरल करणारे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर मुंबई पोलिस दलातील विश्वास नांगरे पाटील यांची कृष्णप्रकाश यांच्या जागी नियुक्ती झाल्याचेही त्या व्हायरल मेसेजमध्ये म्हटलेले होते. त्यामुळे आता पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त नांगरे पाटील होणार अशी चर्चा रंगली होती.
कृष्णप्रकाश यांच्या जागी आता विश्वास नांगरे पाटील येणार म्हणून काही कर्मचारी आणि अधिकारी आनंदी झाले होते, असेही म्हटले जात आहे. कारण अनेकजण त्यांच्या बदलीची वाट पाहत आहे. त्यामुळे १ एप्रिलच्या सकाळपासून अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये धावपळ सुरु होती.
दरम्यान, कृष्णप्रकाश त्यांच्या धाडसी कारवायांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. त्यांची एक शिस्त आहे, जी ते कोणालाही मोडू देत नाही. २ सप्टेंबरला त्यांची पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. कृष्णप्रकाश हे १९९८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे.
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकींग! आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्वाच्या साक्षीदाराचा अचानक मृत्यू; कारणही आले समोर
समीर वानखेडेची पोलखोल करणारा आर्यन केसमधील साक्षीदार प्रभाकर साईलचा अचानक मृत्यू
चित्रपट न पाहताच आभिषेक बच्चनने दिली द काश्मिर फाईल्सवर प्रतिक्रिया, म्हणाला, काहीही बोला पण तुम्हाला..