Share

कुशल बद्रिकेने बायकोसाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, खरंच तुझा अभिमान वाटतो

Kushal Badrike

‘चला हवा येऊ द्या’ फेम विनोदवीर कुशल बद्रिके (Kushal Badrike) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. याद्वारे तो अनेक पोस्ट शेअर करत नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहतो. यामध्ये कधी तो त्याचे स्वतःचे, बायकोमुलांसोबतचे फोटो आणि व्हिडिओसुद्धा शेअर करत असतो. आताही कुशलने त्याची बायकोसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

कुशल बद्रिकेच्या बायकोचे नाव सुनयना असे असून ती एक कथ्थक डान्सर आहे. कुशल आणि सुनयानाचं लव्हमॅरीज असून दोघांनी २००९ मध्ये लग्नगाठ बांधली. आज त्या दोघांना दोन गोंडस मुले देखील आहेत. परंतु, संसाराची जबाबदारी पार पाडत असताना सुनयना तिच्या करिअरसाठी जास्त वेळ देऊ शकली नाही. पण त्यातही तिने आपला छंद जोपासण्याचा प्रयत्न केला.

नुकतीच सुनयनाने दिल्ली येथे पार पडलेल्या कथ्थक महोत्सवात सहभाग घेतला. तिथे सुनयनाने तिचे कथ्थक नृत्य सादर केले. यासंदर्भात कुशलने एक पोस्ट शेअर करत बायको सुनयनाचे भरभरून कौतुक केले. तसेच या पोस्टमध्ये त्याने आपल्या बायकोचा खूप अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे.

कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर बायको सुनयनाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने लिहिले की, ‘खरंतर तू दिल्लीला जाऊन ‘कथ्थक केंद्रात’ शिकावं हे माझं स्वप्न होतं. पण घरच्या जबाबदारीत ते मागे पडत राहीलं.. ते राहीलंच! पण बघ ना आज तू तिथे परफॉर्म करतेस ‘खरंच तुझा खूप अभिमान वाटतो’

पुढे त्याने लिहिले की, ‘आयुष्यातली सगळीच स्वप्न आकार घेत नाहीत. पण त्यातली काही साकार होतात हे खरं. ही संधी तुला देणार्‍यांचे मनःपूर्वक आभार. आणि एकच गोष्ट सांगेन, जा… सिमरन, जा जी ले अपनी जिंदगी…’ कुशलच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत त्याला आणि सुनयनाला शुभेच्छा देत आहेत.

दरम्यान, कुशल बद्रिके ‘चला हवा येऊ द्या’ या शोद्वारे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करतो. आपल्या विनोदाने तो रसिकांना खळखळून हसवतात. त्याच्या प्रत्येक स्कीटला प्रेक्षकांचीही खूप पसंती मिळत असते. छोट्या पडद्यासोबत कुशलने अनेक मराठी चित्रपटातही काम केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
प्रेक्षकांचे मन जिंकण्याच्या नादात..; किरण रावसोबतच्या घटस्फोटावर आमिरने पहिल्यांदाच सोडले मौन
अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या अभिनेत्रीला चोरी करताना अटक; चौकशीत झाला मोठा खुलासा
चित्रपट करमुक्त करणे म्हणजे काय? निर्मात्यांना त्याचा काय फायदा होतो? वाचा सविस्तर..

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now