Share

दिल्लीतून आलं पत्र, युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांची निवड

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणूकीत मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांना सर्वाधिक म्हणजे पाच लाख मते मिळाली. आता कुणाला राऊत यांची बुधवारी प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. (kunal raut elected maharashtra congress youth president)

अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही यांनी पत्राद्वारे कुणार राऊत यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यभरात त्यांच्या चाहत्यांनी आणि युवक काँग्रेसच्या सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाकेही उडवले आहे.

युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी चुरशीची लढत पहायला मिळाली होती. या निवडणूकीत कुणाल राऊत यांना सर्वाधिक मते मिळाली आहे. त्यांना ५,४८,२६७ मते मिळाली आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवराज मोरे यांना ३,८०,३६७ आणि बसवराज पाटील यांना २,४६,६९५ मते मिळाली होती.

सत्यजीत तांबे यांच्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे त्यांच्याजागी नवीन प्रदेशाध्यक्ष निवडण्यासाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणूकीत सर्वाधिक मते कुणाल राऊत यांना मिळाली होती. त्यामुळे आता फक्त निवडीची घोषणा बाकी होती.

कुणाल राऊत हे उर्जामंत्री नितीन राऊत यांचे सुपूत्र आहेत. कुणाल राऊत यांचा जन्म १७ फेब्रुवारी १९८९ रोजी झाला होता. विद्यार्थी दशेतच त्यांनी राजकारणाला आणि समाजकारणाला सुरुवात केली होती. संकल्प आणि स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली होती.

कुणार राऊत यांनी काँग्रेसच्या एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष सुरु केला. एनएसयुआयचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी २००९ पासून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ते सलग दोनदा निवडणूकीच्या माध्ममातून युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवडून आले होते. तर २०१८ साली ते युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले होते.

महत्वाच्या बातम्या-
केंद्र सरकारची भन्नाट योजना, जन धन खाते धारकांना दर महिन्याला मिळणार तीन हजार रुपये
१२ रुपयांच्या या शेअरने गुंतवणूकदारांना दिला बंपर परतावा, एका लाखाचे झाले १.६४ कोटी रुपये
‘देवमाणूस’मधील ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता अजूनही चालवतो रिक्षा, कारण वाचून डोळे पाणावतील

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now